दिल्लीतील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ बीडमध्ये २७ जुलैला जनक्रांती रॅलीचे आयोजन
बीड, 24 जुलै (हिं.स.)। दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ तसेच नीट (NEET) प्रश्नपत्रिका फुटीच्या विरोधात बीड येथे सोमवार, २७ जुलै रोजी भव्य विद्यार्थी-पालक जनक्रांती रॅली आयोजित क
रॅलीचे आयोजन


बीड, 24 जुलै (हिं.स.)। दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ तसेच नीट (NEET) प्रश्नपत्रिका फुटीच्या विरोधात बीड येथे सोमवार, २७ जुलै रोजी भव्य विद्यार्थी-पालक जनक्रांती रॅली आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ११ वाजता किल्ला मैदान (बलभीम-मिलिया महाविद्यालय परिसर) येथून रॅलीला प्रारंभ होणार आहे.

या रॅलीत बीड शहरातील शाळा, महाविद्यालये, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, पालक तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. सहभागी विद्यार्थी व पालक हातात तिरंगा ध्वज आणि महापुरुषांची छायाचित्रे घेऊन शांततेत रॅली काढणार आहेत. आयोजकांनी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

रॅलीच्या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृह येथे नियोजन बैठक घेण्यात आली. बैठकीत रॅलीचे नियोजन, शिस्त, मार्ग आणि कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर नीट परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटीच्या पार्श्वभूमीवर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार असून, कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने होणार आहे.बैठकीस सुशीला मोराळे, प्राचार्य डॉ. सविता शेटे, प्राचार्य डी. जी. तांदळे, दादासाहेब मुंडे आदी उपस्थित होते.

----------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande