
छत्रपती संभाजीनगर, 24 जुलै (हिं.स.)।
जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हातील प्रत्येक तालुक्यात विशेष घटक व सर्वसाधारण प्रवर्गाकरिता मोफत तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा जिल्ह्यातील युवक युवतींनी लाभ घ्यावा,असे आवाहन विभागीय अधिकारी सुदाम थोटे व जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक श्रीमती करूणा खरात यांनी केले आहे.
तालुकानिहाय उपलब्ध अभ्यासक्रम-
१.छत्रपती संभाजीनगर (शहर)- सोलर टेक्निशियन प्रशिक्षण,गारमेंट मेकिंग प्रशिक्षण,बेकरी प्रोडक्ट प्रशिक्षण,कॉफी कल्चर प्रशिक्षण,दुचाकी इलेक्ट्रिक वाहन दुरुस्ती प्रशिक्षण,डी.टी.पी.प्रशिक्षण,टॅली GST प्रशिक्षण,डिजिटल फोटोग्राफी प्रशिक्षण,जूट वर्क प्रशिक्षण,वेल्डिंग टेक्निशियन.
२.सोयगाव- गारमेंट मेकिंग
३.सिल्लोड-फूड प्रोसेसिंग (मँगो) प्रशिक्षण,आरी वर्क (जरी जरदोजी )
४.फुलंब्री- डीटीपी, ज्युट वर्क.
५.खुलताबाद-आरी वर्क, जरीजरदोजी, डी.टी.पी.
६.कन्नड- घरगुती उपकरणे दुरुस्ती, डी.टी.पी.
७.गंगापूर-वेब डीझायनिंग, बेकरी पदार्थ बनविणे, फेब्रीकेशन वर्क.
८.वैजापूर- दुचाकी इलेक्ट्रिक वाहन दुरुस्ती, फॅशन डिझायनिंग.
९.पैठण- डीटीपी.
अतिरिक्त अभ्यासक्रम- या तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षणा सोबतच उद्योजकीय अभ्यासक्रमाचा समावेश आहे. ज्यात उद्योजकीय गुणसंपदा, शासकीय कर्ज योजनांची माहिती, प्रकल्प अहवाल,मार्केटिंग कौशल्य इ.विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे.
पात्रता- प्रशिक्षणार्थीला उद्योग करण्याची प्रबळ इच्छाअसावी,वय १८ वर्ष पूर्ण, किमान शिक्षण सातवी पास,स्वतः चे नावे बँक खाते व प्रशिक्षणास पूर्ण वेळ देणे आवश्यक.
आवश्यक कागदपत्रे- पासपोर्ट साईज फोटो,आधार कार्ड, बँक पास बुक प्रत,शाळा सोडल्याचा दाखला तसेच विशेष घटक प्रवर्गातील प्रशिक्षणार्थीकरिता जातीचे प्रमाणपत्र.
विद्यावेतन उपलब्ध- यशस्वी प्रशिक्षणानंतर एक महिना कालावधीच्या प्रशिक्षणा करिता १ हजार रुपये व दोन महिने कालावधीच्या प्रशिक्षणा करिता दोन हजार रुपये लाभार्थ्याच्या खात्यावर विद्यावेतन जमा करण्यात येईल व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
संपर्क-
अधिक माहितीकरिता महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, (एमसीईडी) अ-३८, एमआयडीसी रेल्वे स्टेशन एरिया,देवगिरी कॉलेज जवळ छ संभाजीनगर येथे भारती सोसे, प्रकल्प अधिकारी एम.सी.ई.डी. छत्रपती संभाजीनगर मोबाईल क्रमांक ९१६८६६७१२२ येथे संपर्क करावा.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis