बीड - मौजे पुसरा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केली कामाची पाहणी
बीड, 24 जुलै (हिं.स.)। जिल्हाधिकारी, बीड यांनी आज मौजे पुसरा येथे सुरू असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (ITI) कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी कामाच्या गुणवत्तेचा, प्रगतीचा व नियोजित वेळेत काम पूर्ण होण्यासाठी आवश्यक बाबींचा आढावा घेण्या
आयटीआयची पाहणी


बीड, 24 जुलै (हिं.स.)।

जिल्हाधिकारी, बीड यांनी आज मौजे पुसरा येथे सुरू असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (ITI) कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी कामाच्या गुणवत्तेचा, प्रगतीचा व नियोजित वेळेत काम पूर्ण होण्यासाठी आवश्यक बाबींचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांना आधुनिक व दर्जेदार प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे काम गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

शैक्षणिक पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी प्रशासन कटिबद्ध असून, या प्रकल्पामुळे परिसरातील युवक-युवतींना कौशल्याधारित शिक्षणाच्या अधिक चांगल्या संधी उपलब्ध होणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande