येवल्यात भाजयुमोकडून वृक्षारोपण व श्रमदान
येवला, 24 जुलै (हिं.स.)। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येवला शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी येवल्यातील विठ्ठलनगर भागातील मारुती मंदिर परिसरात भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आणि नगरसेवक
Tree plantation and Shramdaan


येवला, 24 जुलै (हिं.स.)। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येवला शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी येवल्यातील विठ्ठलनगर भागातील मारुती मंदिर परिसरात भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आणि नगरसेवक समीर समदडिया यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण आणि श्रमदान करण्यात आले. या प्रसंगी विविध प्रकारच्या फळझाडांचे आणि फुलझाडांचे वृक्षारोपण करण्यात येऊन, या झाडांचे योग्य संगोपन आणि काळजी घेण्याची जबाबदारी देखील कार्यकर्त्यांनी घेतली.

निसर्ग आणि मानवाचे अतूट नाते आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आज मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी राज्यात अनेक महत्त्वाच्या आणि लोककल्याणकारी योजना सुरू केल्या असून त्याचा थेट लाभ जनतेला मिळत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य आज प्रगतीपथावर असून, त्यांच्या या उत्कृष्ट कामामुळे नागरिक खुश आहेत. या सामाजिक उपक्रमाच्या वेळी तालुकाध्यक्ष नानासाहेब लहरे,बापू गाडेकर,गणेश दोडे यांच्यासह भाजपचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande