बीड - मोरवड येथे वृक्षारोपण व विद्यार्थ्यांशी जिल्हाधिकाऱ्याचा प्रेरणादायी संवाद
बीड, 24 जुलै (हिं.स.)। आज मोरवड (ता. वडवणी) येथे माननीय जिल्हाधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. वृक्षारोपणानंतर जिल्हाधिकारी यांनी तेथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. पर्यावरण संव
जिल्हाधिकाऱ्यांचा संवाद


बीड, 24 जुलै (हिं.स.)। आज मोरवड (ता. वडवणी) येथे माननीय जिल्हाधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

वृक्षारोपणानंतर जिल्हाधिकारी यांनी तेथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. पर्यावरण संवर्धन, शिक्षणाचे महत्त्व आणि उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास गौरव इंगोले (उपविभागीय अधिकारी, माजलगाव), तोंडे (कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग), विवेक उडान (तहसीलदार, वडवणी) तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande