एसआयआर-२०२६ : मतदारांच्या मदतीसाठी हेल्प डेस्क आणि संपर्क अधिकारी नियुक्त
पुणे, 24 जुलै, (हिं.स.)। विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर-२०२६) मोहिमेअंतर्गत मतदारांना आवश्यक माहिती, मार्गदर्शन आणि तातडीचे सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत विधानसभा मतदारसंघनिहाय विशेष मदत कक्ष सुरू करण्यात आले आहेत. मतदारा
Voter


पुणे, 24 जुलै, (हिं.स.)। विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर-२०२६) मोहिमेअंतर्गत मतदारांना आवश्यक माहिती, मार्गदर्शन आणि तातडीचे सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत विधानसभा मतदारसंघनिहाय विशेष मदत कक्ष सुरू करण्यात आले आहेत. मतदारांच्या शंका, तक्रारी आणि अडचणींचे निराकरण करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाची १९५० हेल्पलाईन देखील कार्यरत आहे.पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समन्वयाने पुणे जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथे हे मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, मतदार यादीतील नोंदीतील दुरुस्ती तसेच इतर निवडणूकविषयक बाबींवर नागरिकांना मार्गदर्शन केले जाणार आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी राहुल शेडगे, २०६ पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी अतुल किर्वे आणि २०७ भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी पंकज पवार यांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील राखीव मदत कक्षासाठी दिलीप आंब्रे यांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande