
छत्रपती संभाजीनगर, 24 जुलै (हिं.स.)।
महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस सदिच्छा भेट देत बँकेच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या.
यावेळी बँकेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, शेतकरी, सभासद आणि ग्राहकांना अधिक सक्षम व गुणवत्तापूर्ण सेवा देण्याच्या दिशेने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. सर्व मान्यवरांनी पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत बँकेच्या प्रगतीसाठी सहकार्याची ग्वाही दिली.
यावेळी मंत्री अतुल सावे खासदार संदीपान भुमरे, आमदार श्री. रमेश बोरनारे, आमदार श्रीमती अनुराधाताई चव्हाण, नगराध्यक्ष श्री. समीर अब्दुल सत्तार, बँकेचे सर्व संचालक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis