छ. संभाजीनगर जिल्ह्यात श्रमशक्ती, उद्योग, कुटुंब उत्पन्न, स्थलांतर विविध वार्षिक सर्वेक्षणाचे कामकाज सुरु
छत्रपती संभाजीनगर, 24 जुलै (हिं.स.)। राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयामार्फत नियतकालिक श्रमशक्ती,असंघटित क्षेत्रातील उद्योग, कुटूंब उत्पन्न, किंमत संकलन, स्थलांतर तपशील अशा विविध वार्षिक सर्वेक्षणाचे कामकाज जिल्ह्यात सुरु आहे. या सर्वेक्षणांना नागरिक
छ. संभाजीनगर जिल्ह्यात श्रमशक्ती, उद्योग, कुटुंब उत्पन्न, स्थलांतर विविध वार्षिक सर्वेक्षणाचे कामकाज सुरु


छत्रपती संभाजीनगर, 24 जुलै (हिं.स.)।

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयामार्फत नियतकालिक श्रमशक्ती,असंघटित क्षेत्रातील उद्योग, कुटूंब उत्पन्न, किंमत संकलन, स्थलांतर तपशील अशा विविध वार्षिक सर्वेक्षणाचे कामकाज जिल्ह्यात सुरु आहे. या सर्वेक्षणांना नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या प्रगणकांना सहयोग देऊन सहकार्य करावे,असे आवाहन वरिष्ठ सांख्यिकीय अधिकारी मुकेश बाबू यांनी केले आहे.

राबविण्यात येणारे सर्वेक्षण व त्याबाबत थोडक्यात माहिती याप्रमाणे-

नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण अंतर्गत श्रम शक्ती सहभाग दर, कामगार-लोकसंख्या गुणोत्तर आणि बेरोजगारी दर यांसारखे प्रमुख श्रमबाजार निर्देशांक तयार केले जातात. हे निर्देशांक ग्रामीण व शहरी भागांसाठी मासिक, त्रैमासिक तसेच वार्षिकस्तरावर प्रसिद्ध केले जाणार आहेत. याशिवाय, विविध वयोगट, लिंग, शिक्षणाची पातळी, रोजगार स्थिती, उद्योग व व्यवसाय यानुसार सविस्तर आकडेवारी वार्षिक अहवालाद्वारे उपलब्ध करून दिली जाणार आहे.

असंघटीत क्षेत्राचे सर्वेक्षण

तसेच भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्त्वपूर्ण असलेल्या असंघटित क्षेत्राची आर्थिक व कार्यात्मक माहिती संकलित करण्यासाठी असंघटीत क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण २०२६ हे सर्वेक्षण आयोजित करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात उत्पादन, व्यापार आणि इतर सेवा क्षेत्रांतील असंघटित, बिगर-कृषी आस्थापनांचा समावेश असेल. या सर्वेक्षणातून रोजगार निर्मिती, उत्पादन, उत्पन्न, व्यवसायाची स्थिती आणि राष्ट्रीय उत्पन्नातील योगदान याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे.

किंमत संकलन सर्वेक्षण

शहरी,ग्रामिण भागातील ग्राहक किंमत निर्देशांक सर्वेक्षण केले जाते. त्यात एका निश्चित वेळापत्रकानुसार निवडक दुकाने, बाजारपेठा, सेवा प्रदाते आणी संस्थांकडून प्रत्यक्ष किमती गोळा करतात. वस्तूंची यादी आणि वजन हे घरगुती उपयुक्तता खर्च सर्वेक्षणावर आधारीत असतात. या प्रक्रियेत सर्वेक्षण गणक प्राथमिक सर्वेक्षण करेल. तपासणीचे काम वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी व सर्वेक्षण पर्यवेक्षक हे करतील.

परिस्थिती मूल्यांकन सर्वेक्षण

या सर्वेक्षणात भारतातील शेतकरी कुटुंबाच्या आर्थिक स्थितीबाबत सविस्तर माहिती संकलित केली जाते.शेतकरी कुटुंबाचे उत्पन्न आणि उपभोग या विषयीचे मुल्यांकन केले जाते.ग्रामिण शहरी कुटूंबाची मालमत्ता,कर्ज, गुंतवणूकीचे स्वरुप याबाबत सर्वसमावेशक माहिती पुरविण्यात येते. ह्या सर्वेक्षणाचे काम सर्वेक्षण गणकद्वारे केले जाते तर तपासणीचे काम सर्वेक्षण पर्यवेक्षक करतात.

स्थलांतर तपशील सर्वेक्षण

या सर्वेक्षणात कुटुंब व व्यक्तिंच्या स्थलांतराचा व स्थलांतर पद्धतीचा अभ्यास केला जातो. ही माहिती संकलित करुन पुराव्यांवर आधारीत धोरणनिर्मितीस मदत होते. प्राथमिक काम सर्वेक्षण गणक करतात तपासणीचे काम पर्यवेक्षक करतात.

राष्ट्रीय कुटुंब उत्पन्न सर्वेक्षण

देशातील कौटुंबिक उत्पन्न आणि उत्पन्नाच्या वितरणाबाबत विश्वसनीय अंदाज करण्याच्या उद्देशाने हे सर्वेक्षण केले जाते.प्राथमिक काम सर्वेक्षण गणक करतात तर तपासणी पर्यवेक्षक करतात.

उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण

नोंदणीकृत सेवा क्षेत्रातील उपक्रमांचे केले जाणारे हे पहिले वार्षिक सर्वेक्षण आहे. कॉर्पोरेट सेवा क्षेत्रातील उपक्रस्मांवर एक व्यापक डेटाबेस तयार करण्यासाठी हे सर्वेक्षण केले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande