सुशोभित आणि प्रकाशमय कंधार!- आमदार चिखलीकर
नांदेड, 24 जुलै (हिं.स.)। सुशोभित आणि प्रकाशमय कंधार शहर करण्याचा मानस आपला आहे त्या दृष्टीने आपण विकासाची कामे करीत आहोत नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रसाद पाटील चि
अ


नांदेड, 24 जुलै (हिं.स.)।

सुशोभित आणि प्रकाशमय कंधार शहर करण्याचा मानस आपला आहे त्या दृष्टीने आपण विकासाची कामे करीत आहोत नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रसाद पाटील चिखलीकर यांनी केले आहे

कंधार शहरातील महाराणा प्रताप चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या प्रमुख रस्त्यावर नव्याने उभारण्यात आलेल्या आधुनिक विद्युतीकरण व सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.

या प्रकल्पाच्या माध्यमातून शहराचे सौंदर्य अधिक खुलले असून नागरिकांना उत्तम सोयी-सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत!

यावेळी उपविभागीय अधिकारी श्री. विलास नरवटे, तहसीलदार श्री. रामेश्वर गोरे, पोलीस उप अधीक्षक श्री. सुशील मोपडे, मनान चौधरी यांच्यासह सर्व अधिकारी, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande