
रत्नागिरी, 24 जुलै (हिं.स.) । प्रभानवल्ली (ता. लांजा) येथील श्री बल्लाळ गणेश देवस्थान परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
लांजा येथील न्यू एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे कला व वाणिज्य महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे कै. काकासाहेब सरफरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वृक्षलागवड करण्यात आली. काजू कलमे आणि रक्तचंदनाच्या रोपांची लागवड करून वृक्षारोपण कार्यक्रम साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला महाविद्यालयाचे डॉ. राहुल मराठे आणि एनएसएसचे बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. शिवसेनेचे दत्ताजी कदम आणि रवींद्र डोळस तसेच इतर कार्यकर्ते आणि देवस्थानचे मंगेश जाधव, डॉ. भरत पाटील, अनिल चव्हाण, गुरू मासये , विक्रांत बेर्डे सर, परेश दळी, दिगंबर भिंगार्डे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात ाले. प्रभानवल्लीतील ग्रामस्थही या उपक्रमात सहभागी झाले.
आणखी कोणत्या संस्थेला किंवा शासकीय यंत्रणेला वा व्यक्तींना बल्लाळ गणेश देवस्थानाच्या परिसरात वृक्षारोपण करायचे असल्यास त्यांनी देवस्थान समितीचे अध्यक्ष अमोल रेडीज किंवा कार्यवाह वसंत पावसकर यांच्याशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी 9623733766 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी