सहकार चळवळीतील मान्यवर, सक्रिय कार्यकर्ते आणि सेवा सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक
नांदेड, 25 जुलै (हिं.स.)। नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देगलूर व बिलोली तालुक्यातील सहकार चळवळीतील मान्यवर, सक्रिय कार्यकर्ते आणि सेवा सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्या अध्
अ


नांदेड, 25 जुलै (हिं.स.)।

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देगलूर व बिलोली तालुक्यातील सहकार चळवळीतील मान्यवर, सक्रिय कार्यकर्ते आणि सेवा सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली.

बैठकीत शेतकरी विकास पॅनलच्या प्रचाराची दिशा, निवडणुकीचे नियोजन आणि सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकरी आणि सभासदांच्या हितासाठी शेतकरी विकास पॅनलला विजयी करण्याचे आवाहन यावेळी केले.

यावेळी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार जितेश अंतापूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande