आषाढी एकादशीला रुक्मिणीच्या माहेरी भक्तीचा महासागर; कौंडण्यपुरात भाविकांची मोठी गर्दी
अमरावती, 25 जुलै (हिं.स.) जिल्ह्यातील वर्धा नदीच्या पवित्र तीरावर वसलेले कौंडण्यपुर हे रुक्मिणी मातेचे माहेर म्हणून ओळखले जाते. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त या ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळी आज भक्तीचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला. पंढरपूरमध्ये व
आषाढी एकादशीला रुक्मिणीच्या माहेरी भक्तीचा महासागर; कौंडण्यपुरात भाविकांची मोठी गर्दी


अमरावती, 25 जुलै (हिं.स.)

जिल्ह्यातील वर्धा नदीच्या पवित्र तीरावर वसलेले कौंडण्यपुर हे रुक्मिणी मातेचे माहेर म्हणून ओळखले जाते. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त या ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळी आज भक्तीचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला. पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी जमत असतानाच विदर्भातील भाविकांनीही रुक्मिणीच्या माहेरी मोठ्या श्रद्धेने हजेरी लावतात.पहाटेपासूनच मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. विठ्ठल... विठ्ठल... आणि रुक्मिणी माता की जय अशा जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. वारकरी संप्रदायातील भाविकांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात भजन, कीर्तन आणि नामस्मरण करत भक्तिमय वातावरण निर्माण केले. मंदिरात विशेष पूजा, महाआरती आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.पौराणिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णाची अर्धांगिनी रुक्मिणीचे माहेर कौंडण्यपुर येथे असल्याने या स्थळाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. त्यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी येथे दर्शन घेण्यासाठी विदर्भासह राज्यातील विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने येतात.मंदिर परिसरात भक्तांच्या सोयीसाठी प्रशासन आणि मंदिर समितीकडून आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती. वर्धा नदीकाठी वसलेल्या या पवित्र स्थळी दिवसभर भक्तांचा ओघ कायम राहतो. पंढरपूरच्या वारीप्रमाणेच कौंडण्यपुरातही भक्ती, श्रद्धा आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजराने आषाढी एकादशीचा सोहळा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande