
नांदेड, 25 जुलै (हिं.स.)।नांदेड जिल्ह्यातील कंधार येथेआषाढी महोत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कंधार येथील विविध शाळा आणि संस्थेच्या वतीने विठ्ठल दिंडी ही काढण्यात आली होती. आषाढी एकादशीच्या निमित्ताने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते
प्रियदर्शनी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक मुलींचे विद्यालय कंधार च्या वतीने आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रखुमाई यांचा सजीव देखावा तयार करून कंधार शहरात वारकऱ्यांच्या वेश भुशेतील विद्यार्थीची पायी दिंडी काढण्यात आली,यावेळी माजी आमदार ईश्वरराव भोसीकर ,कंधार तालुका कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय भोसीकर,माजी जि.प.तथा नांदेड जिल्हा महिला कॉग्रेसच्या उपाध्यक्षा सौ.वर्षाताई भोसीकर,कंधारचे पोलिस निरीक्षक घोडके,संस्थेचे उपाध्यक्ष कृष्णाभाऊ भोसीकर,प्राचार्य किरण बडवणे यशवंत पाटील भोसीकर,प्राध्यापक शिक्षक शिक्षिका पालक विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis