नाशिक : गोदावरीचा रौद्रावतार कमी मात्र चांदोरी-सायखेड्यात पूरस्थिती कायम
नाशिक, 25 जुलै, (हिं.स.)। जिल्ह्यातील चांदोरी आणि सायखेडा या परिसरामध्ये असलेल्या पुराच्या पाण्याचा वेढा हा दुसऱ्या दिवशीही दुपार पर्यंत कायम होता दरम्यान पावसाने काहीशी उसंत घेतल्यानंतर गोदावरी नदीचा पूर हा ओसरण्यास सुरुवात झाली असून गोदावरी नदीचे
Chandori-Saikheda-remains-


नाशिक, 25 जुलै, (हिं.स.)। जिल्ह्यातील चांदोरी आणि सायखेडा या परिसरामध्ये असलेल्या पुराच्या पाण्याचा वेढा हा दुसऱ्या दिवशीही दुपार पर्यंत कायम होता दरम्यान पावसाने काहीशी उसंत घेतल्यानंतर गोदावरी नदीचा पूर हा ओसरण्यास सुरुवात झाली असून गोदावरी नदीचे पाणी देखील कमी होत आहे. तर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसुल या ठिकाणी दरड कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

जिल्ह्यामध्ये मागील तीन दिवसांपासून पुष्प नक्षत्राचा सुरू असलेला पावसाने शनिवारी काहीशी दुपारनंतर विश्रांती घेतली त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालेला आहे. सतत कोसळत असलेल्या पावसामुळे विविध धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे निफाड तालुक्यातील चांदोरी व सायखेडा या दोन गावांना शुक्रवारी पाण्याने वेढले होते पाण्याच्या वेढा हा शनिवारी कायम होता या ठिकाणी असलेल्या शाळा वैद्यकीय प्राथमिक आरोग्य केंद्र ही दुसऱ्या दिवशीही पाण्याखालीच होती . त्यामुळे या दोन्हीही गावांचा जनजीवन दुसऱ्या दिवशीही विस्कळीत झालेले होते. प्रश्नाचे वरिष्ठ अधिक अधिकारी या ठिकाणी दाखल झाले असून शनिवारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि खासदार भगरे यांनी या भागाचा दौरा करून पाहणी केली नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.

पावसाचा जोर ओसरल्यानंतर प्रशासनाकडून देखील आता पावसाने नुकसान झालेल्या भागांमध्ये पंचनामा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे विविध भागांमध्ये प्रशासनाचे कर्मचारी काही भागांमध्ये अधिकारी स्वतः पंचनामा करत असल्याचे सांगण्यात आले आहे. तर सतत सुरू असलेल्या पावसामुळे हरसुल या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील भागामध्ये दरड कोसळली सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी या भागामध्ये वाहतूक मात्र ठप्प झाली होती प्रशासनाने तातडीने पावलं उचलून ही दरड दूर केली आणि काही वेळानंतर हित वाहतूक सुरळीत झाली पावसाने उसंत घेतल्यामुळे गोदावरी नदीला असलेला पूर हा पसरला असून पाण्याखाली गेलेले छोटे पूल मोकळे झाले आहेत. त्यामुळे या पुलावरून वाहतूक सुरू झाली आहे. तर पुराचे मापदंड असलेला मारुतीला छातीपर्यंत पाणी असल्याचे दिसून येत होते. पुर सरल्यामुळे नदीकाठच्या भागांमध्ये असलेल्या व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना काहीसा दिलासा मिळालेला आहे.

जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात एकूण 15 धरणांमधून पाणीपुरवठा हा नदीपात्रामध्ये सोडण्यात आला होता. त्यामध्ये गंगापूर धरणातून 8370, कळवा 848, भावली 2152, पालखेड 2052, पुणे गाव 1568, ओझरखेड 111, धरणा 19312, गौतमी पंधराशे कश्यपी 500, वालदेवी 2496 ,भाम 6359, विजापूर 2800, आळंदी 30 दशलक्ष घनफूट पाणी हे नदीपात्रामध्ये सोडण्यात आलेले होते तर नांदूर मधमेश्वर या बंधाऱ्यातून एकतर हजार छत्तीस इतका व होळकर पुला वरून 13424 इतका पाण्याचा विसर्ग हा सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पुर ओसरल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून जनजीवन पूर्व पदावर येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande