
बीड, 25 जुलै (हिं.स.)। वडवणी तालुक्यातील पुसरा येथे 'मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजने' अंतर्गत बीड जिल्ह्यातील पहिल्या शेत पाणंद रस्त्याचे उद्घाटन माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले. याचवेळी रस्त्याच्या कामालाही प्रत्यक्ष प्रारंभ करण्यात आला. या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतापर्यंत सर्व ऋतूंमध्ये सुलभ व सुरक्षित वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार असून, शेतीमालाची ने-आण अधिक जलद व सोयीची होईल. ग्रामीण विकासाला गती देणारा हा उपक्रम शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले तसेच सहाय्यक अभियंता सानप यांची प्रमुख उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis