
नांदेड, 25 जुलै (हिं.स.)।
भारतीय जनता पक्षाचे खासदार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. नांदेड संचालक मंडळ निवडणूक (२०२६–२०३१) निमित्त ‘ब’ व ‘क’ मतदारसंघातील सेवा सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींची जिल्हास्तरीय बैठक उत्साहात पार पडली.
बैठकीत शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांच्या विजयासाठी संघटनात्मक नियोजन, मतदारांशी प्रभावी संवाद आणि सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकरी आणि सभासदांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या नेतृत्वाला भक्कम पाठिंबा देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी ‘ब’ व ‘क’ मतदारसंघातील शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार श्री. रामचंद्र मुसळे (थेरबनकर), श्री. ज्ञानेश्वर दहिफळे आणि श्री. अनिल पाटील यांना कप-बशी या चिन्हावर मतदान करून प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis