वर्धा मर्चंट नागरी सहकारी पत संस्थेवर गुन्हा दाखल
रक्कम न देताच केली पतसंस्था बंद वर्धा, 25 जुलै (हिं.स.) नागरिकांना १३ टक्के व्याज देण्याचे आमिष देत त्यांच्याकडून मोठी गुंतवणूक करून ती नियमित कालावधीत परत न करता पतसंस्था बंद करून नागरिकांना तब्बल ४ कोटी ५० लाख ५८ हजार ७६६ रुपयांचा गंडा घालण्यात
वर्धा मर्चंट नागरी सहकारी पत संस्थेवर गुन्हा दाखल


रक्कम न देताच केली पतसंस्था बंद

वर्धा, 25 जुलै (हिं.स.) नागरिकांना १३ टक्के व्याज देण्याचे आमिष देत त्यांच्याकडून मोठी गुंतवणूक करून ती नियमित कालावधीत परत न करता पतसंस्था बंद करून नागरिकांना तब्बल ४ कोटी ५० लाख ५८ हजार ७६६ रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी तक्रारीवरून वर्धा मर्चंट नागरी सहकारी पत संस्था मर्या. वर्धा समता नगर या पतसंस्थेवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ जुलै २०२२ ते ८ जुलै २०२६ पर्यंतच्या कालावधी मध्ये समत नगर येथील वर्धा मर्चंट नागरी सहकारी पत संस्थेने आर. डी.व एफ.डी. तसेच इतर स्किम मध्ये १३ टक्के व्याजाचे आमीष देवून समता नगर, सेवाग्राम, वर्धा येथील व इतर भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात रक्कम गुंतवणूक करण्यास सांगितले. या पतसंस्थे मध्ये रक्कम गुंतवणूक केल्यावर गुंतवणूक मुदत वेळ संपल्यावर देखील वर्धा मर्चंट नागरी सहकारी पत संस्थेने गुंतवणुकदारांना ही रक्कम परत केली नाही. एवढेच नाही मोठ्या प्रमाणात गोळा केलेली रक्कम ४ कोटी ५० लाख ५८ हजार ७६६ रुपये परत न करता पतसंस्था बंद करुन अपहार करून फसवणूक केल्याची तक्रार झाली. यावरून भीमराव ऊर्फ भीमा राजेंद्र शंभरकर (रा. समता नगर) विरुद्ध वर्धा शहर पोलिसा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा येथे पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलिस उपअधीक्षक विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनात पोलिस उप निरिक्षक धीरज खोब्रागडे व त्यांचे सहकारी अमंलदार आर्थिक गुन्हे शाखा करीत आहेत.

पोलिसांचे आवाहन पोलिसांद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते आहे की या बँकेत ज्या नागरिकांनी रक्कम गुंतवणुक केलेली असेल व आजपर्यंत परतफेडीचे फार्म भरुन दिलेले नाही अशा सर्व नागरिकांनी आर्थिक गुन्हे शाखा वर्धा येथे उपलब्ध असलेल्या गुंतवणुक रक्कमे संबंधाने पुराव्याचे कागदत्रासह सात दिवसात कार्यालयीन वेळेत येवून सादर करावे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande