आषाढी एकादशी निमित्त देवगिरी बँकेची पर्यावरणपूरक वारी!
छत्रपती संभाजीनगर, 25 जुलै (हिं.स.) आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या अधिकारी, कर्मचारी, संचालक व पदाधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर ते छोटे पंढरपूर मार्गावर पर्यावरणपूरक वारी काढत स्वच्छतेचा संदेश दिला. सर्वांनी गणवेशात
अ


छत्रपती संभाजीनगर, 25 जुलै (हिं.स.)

आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या अधिकारी, कर्मचारी, संचालक व पदाधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर ते छोटे पंढरपूर मार्गावर पर्यावरणपूरक वारी काढत स्वच्छतेचा संदेश दिला. सर्वांनी गणवेशात रस्त्यालगतचा कचरा संकलित करून सामाजिक बांधिलकी जपली. यावेळी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे यांनी अभंग गात कर्मचाऱ्यांसोबत प्रत्यक्ष कचरा उचलून उपक्रमात सहभाग घेतला.

यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण नांदेडकर, बँकेचे माननीय संचालक सुरेश जगाडे, प्रज्ञाताई तल्हार, अमिताताई लेकुरवाळे, श्री दत्ता शिंदे, रुपेंद्र कोयाळकर व सर्व कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होत्या.

या अनोख्या वारीचे आयोजन सौ. मनाली कुलकर्णी यांनी खूप सुंदर केले.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande