ओबीसी मोर्चाच्या नवनियुक्त सदस्यांना नियुक्तीपत्र वितरण
छत्रपती संभाजीनगर, 25 जुलै (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर शहर भाजपा ओबीसी मोर्चाच्या नवनियुक्त कार्यकारिणी सदस्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या कार्यक्रमास कॅबिनेट मंत्री अतुल सावे , तसेच माजी केंद्रीय राज्यमंत्री ड
अ


छत्रपती संभाजीनगर, 25 जुलै (हिं.स.)।

छत्रपती संभाजीनगर शहर भाजपा ओबीसी मोर्चाच्या नवनियुक्त कार्यकारिणी सदस्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

या कार्यक्रमास कॅबिनेट मंत्री अतुल सावे , तसेच माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, संघटन अधिक बळकट करण्यासाठी आणि भारतीय जनता पक्षाची विचारधारा घरोघर पोहचवण्यासाठी समर्पित भावनेने कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande