छ. संभाजीनगर बकवालनगर येथे वारकरी, भाविकांसाठी फराळ व पाणी वाटप
छत्रपती संभाजीनगर, 25 जुलै (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने आषाढी एकादशी निमित्त बकवालनगर (ता.गंगापूर) येथे आज वारकरी, भाविकांसाठी फराळ व पाणी वाटप करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित राहून भाविकांना फराळ वाटप केले. आषाढी एकादशीच्या निमि
अ


छत्रपती संभाजीनगर, 25 जुलै (हिं.स.)।

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने आषाढी एकादशी निमित्त बकवालनगर (ता.गंगापूर) येथे आज वारकरी, भाविकांसाठी फराळ व पाणी वाटप करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित राहून भाविकांना फराळ वाटप केले.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने गंगापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होती. आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठी रांगेही लागली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सतीश चव्हाण यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.

याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस श्री.दिलीप बनकर, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती श्री.बालाजी सोनटक्के, श्री.नासेर पटेल, श्री.नंदु सोनवणे, श्री.अक्षय भवर आदींची उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande