
बीड, 25 जुलै (हिं.स.)। लोकनेते सुंदररावजी सोळंके नागरी सहकारी पतसंस्था, जिजामाता कॉलेज ऑफ फिजिओथेरपी आणि जिजामाता कॉलेज ऑफ नर्सिंग यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त वारकरी व भाविक भक्तांसाठी फराळ वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला.
या उपक्रमाला आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी सदिच्छा भेट देत उपस्थित वारकरी आणि भाविकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी फराळ वाटपात प्रत्यक्ष सहभाग घेत सेवा कार्यात हातभार लावला.
संस्थांच्या वतीने दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविले जात असून, आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे वारकरी आणि नागरिकांनी स्वागत करत आयोजकांचे कौतुक केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis