हत्तीबेटास पर्यटनाचा 'अ' दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार - आ. संजय बनसोडे
लातूर, 25 जुलै (हिं.स.)। प्रभू श्रीराम चंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली हत्तीबेट भूमी असून, या ठिकाणी हैदराबाद मुक्तीचा लढा झालेले ठिकाण आहे, शिवाय लेण्या, गुहाही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या हत्तीबेटास जागतिक दर्जाचा पर्यटनाचा ''अ '' दर्जा मि
संजय बनसोडे


लातूर, 25 जुलै (हिं.स.)। प्रभू श्रीराम चंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली हत्तीबेट भूमी असून, या ठिकाणी हैदराबाद मुक्तीचा लढा झालेले ठिकाण आहे, शिवाय लेण्या, गुहाही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या हत्तीबेटास जागतिक दर्जाचा पर्यटनाचा 'अ ' दर्जा मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची ग्वाही माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी दिली आहे. उदगीर तालुक्यातील देवर्जन गावाच्या पंचक्रोशीत असलेल्या हत्तीबेटावरील श्री स्वामी समर्थ मंदिराच्या सभागृह बांधकामाचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते उद्धाटक म्हणून बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवर्जनचे सरपंच अभिजित साकोळकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. सदस्य तथा गटनेते प्रा. दिलीप मटके, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत कांबळे, प्रकाश बिरादार, उपस्थित होते. व्यासपीठावर अहमदपुरच्या वन परिक्षेत्र अधिकारी वर्षा नागरगोजे, वन परिमंडळ अधिकारी दत्ता फरताडे, वनरक्षक नामदेव डिगोळे, अंबुलगेकर, जिल्हा परिषद सदस्य उमेश उमापुरे, उदगीर न. प. च्या उपाध्यक्षा शितल शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष बालाजी भोसले, कार्याध्यक्ष वसंत पाटील, शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, शशिकांत बनसोडे, माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, पं. स. चे उपसभापती विक्की भोसले, सर्जेराव भांगे, संदिप बिरादार, नगरसेवक शिवकुमार कांबळे, इम्रान सय्यद, व्यंकट बोईनवाड, कमलाकर फुले, फय्याज शेख, बळी सुर्यवंशी, महेश बिरादार, शफी हाशमी, लक्ष्मण बतले, नगरसेविका वर्षा कांबळे, सिमा नेत्रगावकर, सुधाकर बिरादार, गजानन बिरादार, नामदेव डिगोळे, सुग्रीव सुर्यवंशी, बस्वराज उमाटे, गंगाधर गरीबे, गंगाधर दवणीपुरगे, शुभम भुमणे, संतोष रोडगे, अंतेश्वर रोडगे, राजकुमार तवंडे, महानंदा झुकले, राजु हुडगे, नारायण पाटील, रामस्वामी कुसळकर आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना आमदार संजय बनसोडे यांनी, हत्तीबेटास पर्यटनाचा ' ब ' दर्जा प्राप्त असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची लागवड केल्यामुळे हत्तीबेट सध्या हिरवळीने नटले आहे.शाळांच्या सहलीमध्ये चार पटीने वाढ झालेली आहे.अध्यात्मिक, पौराणिक, ऐतिहासिक महत्व असलेले हत्तीबेट पर्यटन स्थळ असल्यामुळे या तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळास जागतिक पर्यटनाचा 'अ' दर्जा मिळवून देण्यासाठी आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रास्ताविक हत्तीबेट पर्यटन विकास समितीचे अध्यक्ष व्ही. एस. कुलकर्णी यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी विद्यार्थ्यांना खेळणीची मोठ्या प्रमाणात गरज असल्यामुळे खेळणी व येथील लेण्या, गुह्यांचे जतन व्हावे यासाठी पण निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. आमदार बनसोडे यांनी हत्तीबेट पर्यटन विकासाची पाहणी करून आवश्यक त्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता डोईफोडे यांना केल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande