बीड - नेकनूर येथे आषाढी एकादशी निमित्त भगवामय वातावरणात ध्वजारोहण सोहळा
बीड, 25 जुलै, (हिं.स.)। आज आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त श्री गुरु बंकट स्वामी महाराज चौक, नेकनूर येथे श्री गुरु बंकट स्वामी महाराजांच्या पवित्र प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून नारळ फोडण्यात आला. त्यानंतर सर्व भाविक, भक्तगण व ग्रामस्थांच्या उपस्थ
आषाढी एकादशी


बीड, 25 जुलै, (हिं.स.)। आज आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त श्री गुरु बंकट स्वामी महाराज चौक, नेकनूर येथे श्री गुरु बंकट स्वामी महाराजांच्या पवित्र प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून नारळ फोडण्यात आला. त्यानंतर सर्व भाविक, भक्तगण व ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिभावाने भगवा ध्वजारोहण करण्यात आले.

जय जय राम कृष्ण हरी श्री गुरु बंकटस्वामी महाराज आणि पांडुरंग विठ्ठलच्या गजरात परिसर भक्तिमय झाला. या प्रसंगी उपस्थित सर्वांनी समाजात एकता, बंधुभाव आणि धर्मपरंपरेचे जतन करण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी उपस्थित सर्व प्रमुख मान्यवर, भाविक भक्त, ग्रामस्थ व युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरा केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande