
बीड, 25 जुलै (हिं.स.)।
दुग्ध, शेळी व कुक्कुटपालनावर पाच दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिर-डॉ. रणजीत शेजुळ
: पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती माजलगाव यांच्या वतीने शेतकरी व पशुपालकांसाठी दुग्ध व्यवसाय, शेळीपालन आणि कुकुटपालन विषयांवरील पाच दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. असे येथील डॉ. रणजित शेजुळ पशुसंवर्धन विभाग पंचायत यांनी सांगितले आहे
हे प्रशिक्षण दि. २७ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत पंचायत समिती, माजलगाव येथे होणार आहे. प्रशिक्षणासाठी शुल्क २०० रुपये असून प्रमाणपत्र शुल्क १० रुपये असे मिळून एकूण २१० रुपये भरावे लागणार आहेत.
या शिबिरात डॉ. इरफान दानिश (सहाय्यक आयुक्त, माजलगाव), समिती माजलगावांनी डॉ.संजय राठोड (पशवैद्यकीय अधिकारी, नित्रुड), डॉ. अक्षय आवळे (पशुवैद्यकीय अधिकारी, सादोळा/तालखेड), डॉ. रंजीत शेजुळ (पशुवैद्यकीय अधिकारी, किटी आडगाव) तसेच डॉ. सुहास सोनवणे (पशुधन पर्यवेक्षक, पात्रुड) हे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
प्रशिक्षणामध्ये आधुनिक दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन, शेळीपालनातील शाखीय पद्धती
कुक्कुटपालन व रोग व्यवस्थापन, शासकीय योजना व अनुदानाची माहिती तसेच पशुसंवर्धन व्यवसायातून अधिक उत्पन्न मिळविण्याचे प्रभावी मार्ग या विषयांचा समावेश आहे.
प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या सहभागीस प्रशिक्षण प्रमाणपत्र देण्यात येणार असून पशुसंवर्धन क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, कमी खर्चात प्रभावी व्यवस्थापन आणि
शाश्वत व्यवसाय उभारणीबाबत सविस्तर मार्गदर्शन मिळणार आहे.
या प्रशिक्षणाचा लाभघेण्यासाठी परिसरातील इच्छुक शेतकरी, युबक, महिला बचतगट सदस्य आणि पशुपालकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ रणजित शेजुळ पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती माजलगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis