सामूहिक शेती, शाश्वत कृषी उपक्रमांची पाहणी : जि.प. सीईओंची बाभुळगावात भेट
अमरावती, 25 जुलै (हिं.स.) पाणी फाउंडेशनच्या ''''फार्मर कप'''' स्पर्धेअंतर्गत सहभागी असलेल्या बाभूळगाव तालुक्यातील उडान महिला शेतकरी गट, राणी अमरावती''''या गटाच्या शेतास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे व जिल्हा ग्रामी
सामूहिक शेती, शाश्वत कृषी उपक्रमांची पाहणी:जि.प. सीईओ संजय धोत्रे यांची बाभुळगावात भेट


अमरावती, 25 जुलै (हिं.स.)

पाणी फाउंडेशनच्या ''फार्मर कप'' स्पर्धेअंतर्गत सहभागी असलेल्या बाभूळगाव तालुक्यातील उडान महिला शेतकरी गट, राणी अमरावती''या गटाच्या शेतास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आनंदराव पिंगळे यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन सुरू असलेल्या उपक्रमांची पाहणी केली व मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वतः शेतात जाऊन पिकांची पाहणी केली आणि महिला शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. त्यांनी खरीप हंगामातील पीकस्थिती, आगामी रबी हंगामाचे नियोजन, सामूहिक शेतीची आखणी, पाणी व्यवस्थापन, सेंद्रिय निविष्ठांचा वापर व उत्पादनवाढीसाठी आवश्यक तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले.

या प्रसंगी बाभूळगावच्या गट विकास अधिकारी उज्वला ढोले, ''उमेद'' - जिल्हा अभियान व्यवस्थापक सारंग आगरकर, जिल्हा व्यवस्थापक (उपजीविका), जिल्हा व्यवस्थापक (विपणन), तालुका अभियान व्यवस्थापक यांच्यासह उमेद अभियानाची संपूर्ण टीम उपस्थित होती. उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उडान महिला शेतकरी गटाच्या निमंत्रक चैताली कपिले व संपूर्ण महिला शेतकऱ्यांचे त्यांच्या या सामूहिक व शाश्वत शेतीच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

१६ महिलांची २४ एकरावर सामूहिक शेती उडान महिला शेतकरी गटात एकूण १६ महिला सदस्य असून त्या तब्बल २४ एकर क्षेत्रावर एकत्रितरीत्या (सामूहिक) शेती करत आहेत. या गटामार्फत शेतीत नवनवीन तंत्रज्ञानाचा व मानक कार्यपद्धतींचा (एसओपी) प्रभावी वापर केला जात आहे. यामध्ये प्रामुख्याने दशपर्णी अर्क निर्मिती, निंबोळी संकलन, गांडूळ खत निर्मिती, एकत्रित निविष्ठा खरेदी, बियाणे उगवण क्षमता चाचणी, रासायनिक व जैविक बीज प्रक्रिया तसेच ''बीबीएफ'' यंत्राद्वारे पेरणी यांसारखे उपक्रम यशस्वीपणे राबवले जात आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande