रत्नागिरी : कर्जमुक्तीसाठी जिल्हा बँकेच्या पात्र शेतकऱ्यांची यादी तयार
रत्नागिरी, 25 जुलै, (हिं.स.) । राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पात्र शेतकऱ्यांची यादी प्राप्त झाली आहे. या पात्र शेतकऱ्यांची यादी संबंधित विविध कार्यकारी सेवा स
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक


रत्नागिरी, 25 जुलै, (हिं.स.) । राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पात्र शेतकऱ्यांची यादी प्राप्त झाली आहे.

या पात्र शेतकऱ्यांची यादी संबंधित विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांची कार्यालये, बँक शाखा कार्यालये तसेच गाव पातळीवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्र / CSC येथे जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande