रत्नागिरी : फुले, फळे, पाने आणि भाज्यांतून साकारला विठुराया
रत्नागिरी, 25 जुलै (हिं.स.) । राजापूर शहरातील गृहिणी व कलाप्रेमी तन्वी प्रदीप कोळेकर यांनी आषाढी एकादशीचे औचित्य साधत फुले, फळे, पाने आणि विविध भाज्यांच्या साहाय्याने विठ्ठलाची आकर्षक प्रतिमा साकारली आहे. त्यांच्या या अनोख्या कलाकृतीने नागरिकांचे ल
आषाढी एकादशीनिमित्त सौ. तन्वी प्रदीप कोळेकर यांनी फुले, फळे, पाने आणि भाज्यांच्या साहाय्याने साकारलेली विठुरायाची आकर्षक कलाकृती.


रत्नागिरी, 25 जुलै (हिं.स.) । राजापूर शहरातील गृहिणी व कलाप्रेमी तन्वी प्रदीप कोळेकर यांनी आषाढी एकादशीचे औचित्य साधत फुले, फळे, पाने आणि विविध भाज्यांच्या साहाय्याने विठ्ठलाची आकर्षक प्रतिमा साकारली आहे. त्यांच्या या अनोख्या कलाकृतीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

निसर्गातील विविध घटकांचा वापर करून धार्मिक आणि सांस्कृतिक विषयांवरील कलाकृती साकारण्यात तन्वी कोळेकर यांचा विशेष हातखंडा आहे. यंदा आषाढी एकादशीनिमित्त त्यांनी तुळशीची पाने, सोनचाफ्याची फुले, विविध पाने, लिंबू, काकडी, गाजर तसेच इतर फळे-भाज्यांच्या साहाय्याने विठुरायाचे मोहक रूप साकारले आहे. या कलाकृतीतून त्यांनी वारकरी संप्रदायाविषयीची श्रद्धा आणि भक्तिभाव अत्यंत कलात्मक पद्धतीने व्यक्त केला आहे.

सन २०१७ पासून त्यांनी पुष्परंगोळीच्या कलेला सुरुवात केली. कोरोना काळात या कलेचा अधिक अभ्यास करून अनेक वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती त्यांनी साकारल्या.

फुले, फळे, पाने आणि भाज्यांच्या माध्यमातून साकारलेल्या विठुरायाच्या या सुंदर कलाकृतीमुळे तन्वी कोळेकर यांच्या कलागुणांचे सर्वत्र कौतुक होत असून, राजापूरच्या कलाविश्वात त्यांच्या नावाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande