
* धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, केंद्र सरकार हाय-हायच्या घोषणांनी दणाणला
लातूर, 25 जुलै (हिं.स.)।
नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, तसेच देशातील विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ लातूरमध्ये 'छात्रों की गूंज... विद्यार्थ्यांचा एल्गार' या कँडल मोर्चाचे आयोजन करण्यात आले. माजी मंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख आणि 'ट्वेंटीवन ॲग्री'च्या संचालिका सौ. अदितीताई अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मोर्चा पार पडला.
या कँडल मोर्चात काँग्रेसचे पदाधिकारी, युवक काँग्रेस, एनएसयूआयचे कार्यकर्ते, विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis