पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज सुरू
- JNVST-2027 साठी 31 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन नांदेड, 25 जुलै (हिं.स.)। पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, शंकरनगर (ता. बिलोली, जि. नांदेड) येथे शैक्षणिक वर्ष 2027-28 साठी इयत्ता सहावी प्रवेश परीक्षा (JNVST-2027) करिता ऑनलाइन अर्ज प्रक्रिया स
पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज सुरू


- JNVST-2027 साठी 31 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड, 25 जुलै (हिं.स.)।

पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, शंकरनगर (ता. बिलोली, जि. नांदेड) येथे शैक्षणिक वर्ष 2027-28 साठी इयत्ता सहावी प्रवेश परीक्षा (JNVST-2027) करिता ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये मान्यताप्राप्त शाळेत इयत्ता पाचवीत शिक्षण घेणारे व जिल्ह्याचे बोनाफाईड रहिवासी असलेले विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र आहेत. या प्रवेश प्रक्रियेसाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.

प्रवेशासाठी विद्यार्थी व पालक हे नांदेड जिल्ह्याचे रहिवासी असणे आवश्यक असून विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये इयत्ता पाचवीत शिकत असावा. तसेच इयत्ता तिसरी, चौथी व पाचवीचे शिक्षण सलग पूर्ण केलेले असावे. विद्यार्थ्याची जन्मतारीख 1 मे 2015 ते 31 जुलै 2017 या कालावधीत असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शासनाच्या नियमानुसार वैध जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026 असून जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी (JNVST-2027) ही 28 नोव्हेंबर 2026 रोजी होणार आहे.

पालकांनी अंतिम तारखेची वाट न पाहता वेळेत ऑनलाइन अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे योग्य प्रकारे अपलोड करावीत, असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य एस. जी. माण्डले यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी प्रवेश अधिसूचनेतील QR Code स्कॅन करावा किंवा श्रीमती बबिता कुतुर (9130977921) अथवा विष्णू यादव (9926928732) यांच्याशी संपर्क साधावा.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande