बीड विलास घुले खून प्रकरण - सौरभ सोनवणे यांच्याशी आरोपीचा फोन संपर्क झाल्याचा घुले कुटुंबाचा आरोप
बीड, 25 जुलै (हिं.स.)। केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले खून प्रकरणात एक नवीन अपडेट आली आहे. विलास घुले याची हत्या होण्यापूर्वी एक मीटिंग झाली होती. यादरम्यान बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे याचा आरोपीसोबत फोनवरून संपर्क झाल्
सौरभ सोनवणे


बीड, 25 जुलै (हिं.स.)। केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले खून प्रकरणात एक नवीन अपडेट आली आहे. विलास घुले याची हत्या होण्यापूर्वी एक मीटिंग झाली होती. यादरम्यान बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे याचा आरोपीसोबत फोनवरून संपर्क झाल्याचा आरोप रमेश घुले यांनी केला आहे. सीडीआर मध्ये स्पष्ट उल्लेख आल्याने घुले कुटुंब आता आक्रमक झाले आहे. एसआयटीच्याच अधिकाऱ्यांनी ही माहिती दिल्याचा दावा घुले कुटुंबाने केला आहे. बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले आहे. सात दिवसात सौरभ सोनवणेसह सीडीआर मधील संपर्कात आलेल्या आरोपींना अटक करा अन्यथा कुटुंबासह जिल्हाधिकारी कचेरीसमोर आमरण उपोषण करू असा इशारा घुले कुटुंबाने निवेदनातून दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande