नेरळ परिसरात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सूचना फलक; पोलिसांचे सतर्कतेचे आवाहन
रायगड, 25 जुलै (हिं.स.)। पावसाळ्यात नेरळ परिसरातील धबधबे, ओढे आणि निसर्गरम्य पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नेरळ फोटोग्राफर असोसिएशनने विविध ठिकाणी सूचना फलक उभारण्याचा उपक्रम हाती घेत
Signboards installed for tourist safety in the Neral area; police urge caution.


Signboards installed for tourist safety in the Neral area; police urge caution.


रायगड, 25 जुलै (हिं.स.)। पावसाळ्यात नेरळ परिसरातील धबधबे, ओढे आणि निसर्गरम्य पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नेरळ फोटोग्राफर असोसिएशनने विविध ठिकाणी सूचना फलक उभारण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाचे नागरिकांसह पर्यटकांकडूनही स्वागत होत आहे.

पावसाळ्यात अनेक पर्यटक धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी काढणे, वाहत्या पाण्यात उतरणे किंवा सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता वाढते. ही बाब लक्षात घेऊन पर्यटकांनी सतर्क राहावे आणि सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करावे, यासाठी जनजागृतीपर सूचना फलक लावण्यात आले आहेत.

यावेळी नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी राहुल वरुटे यांनी पर्यटकांना आवाहन करताना सांगितले की, वर्षा सहलीचा मनमुराद आनंद घ्या; मात्र स्वतःच्या आणि कुटुंबीयांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या. धोकादायक ठिकाणी जाणे टाळा, वाहत्या पाण्यात उतरू नका आणि पोलिस व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा. नेरळ फोटोग्राफर असोसिएशनच्या या सामाजिक उपक्रमामुळे पर्यटकांमध्ये सुरक्षिततेबाबत जनजागृती होण्यास मदत होणार असून संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पावसाळी पर्यटनाचा आनंद घेताना जबाबदारीने व सुरक्षिततेची काळजी घेऊनच पर्यटन करावे, असे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande