समाजाच्या दातृत्वातून गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ : दत्तक पालक योजनेतून 100 विद्यार्थ्यांना मदत
नांदेड, 25 जुलै (हिं.स.)। समाजाच्या दातृत्वातून गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ : दत्तक पालक योजनेतून 100 विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली. संस्कृति संवर्धन मंडळ संचलित श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूल प्रवेशीत गरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक
अ


नांदेड, 25 जुलै (हिं.स.)।

समाजाच्या दातृत्वातून गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ : दत्तक पालक योजनेतून 100 विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली.

संस्कृति संवर्धन मंडळ संचलित श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूल प्रवेशीत गरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधार देणारा गेल्या अनेक वर्षापासून संस्थेत सुरू असलेल्या प्रेरणादायी उपक्रम हायस्कूल विभागात राबविण्यात येत आहे.

सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेअंतर्गत संकलित करण्यात आलेल्या निधीतून 100 पेक्षा अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वितरण संस्थेच्या वसुंधरा सभागृहात करण्यात आले. यासाठी समाजातील दातृत्वशील व्यक्ती, संस्थेचे माजी विद्यार्थी, प्रतिष्ठित नागरिक, उद्योजक आणि संस्था कार्यकर्त्यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील आर्थिक अडचणी कमी करून त्यांना आत्मविश्वासाने शिक्षण घेता यावे, या उद्देशाने राबविण्यात आलेला हा उपक्रम समाजाच्या संवेदनशीलतेचे आणि सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरला.

याच कार्यक्रमातच एकलव्य शिष्यवृत्ती अंतर्गत शैक्षणिक व कौशल्याधारित उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, अशा दोन्ही माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला बळ देणारा हा उपक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. श्रद्धा देशमुख यांनी विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण प्रयत्न, मेहनत आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्याचे आवाहन केले. प्रमुख पाहुणे श्री. आनंद कुलकर्णी यांनी समाजाकडून मिळालेल्या मदतीचे ऋण भविष्यात गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देऊन फेडावे, असा प्रेरणादायी संदेश दिला. संस्थेचे माजी विद्यार्थी व सगरोळी गावातील प्रतिष्ठित व्यापारी श्री. शंकर सुरकुटलावार यांनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण केले.

एका विद्यार्थ्याला मिळालेली मदत म्हणजे केवळ गणवेश किंवा शैक्षणिक साहित्य नव्हे…ती त्याच्या स्वप्नांना मिळालेली नवी दिशा असते!

समाजाच्या दातृत्वातून उभी राहणारी ही शैक्षणिक चळवळ विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande