रूट निश्चितीमध्ये तांत्रिक अडचण; बेलोऱ्याहून 'नाइट लँडिंग' रखडले
- विमानतळावर आवश्यक डीव्हीओआर यंत्रणा झाली इन्स्टॉल अमरावती, 25 जुलै (हिं.स.) बेलोरा विमानतळावरून रात्रीचे लैंडिंग व टेकऑफ ''रूट'' निश्चिती करण्यात तांत्रिक अडचण असल्याने रखडले आहे. रात्री विमानोड्डाणासाठी बेलोरा विमानतळासाठी नेमकी कोणत्या मार्
रूट निश्चितीमध्ये तांत्रिक अडचण; बेलोऱ्याहून 'नाइट लँडिंग' रखडले


- विमानतळावर आवश्यक डीव्हीओआर यंत्रणा झाली इन्स्टॉल

अमरावती, 25 जुलै (हिं.स.)

बेलोरा विमानतळावरून रात्रीचे लैंडिंग व टेकऑफ 'रूट' निश्चिती करण्यात तांत्रिक अडचण असल्याने रखडले आहे. रात्री विमानोड्डाणासाठी बेलोरा विमानतळासाठी नेमकी कोणत्या मार्गाने विमानसेवा द्यावी, यासाठी आपल्याकडे कोणते विमान उपलब्ध आहे. याबाबत एअर इंडियाने डीजीसीएला कळवले आहे. तसेच रात्री थेट मुंबई ते देरा व बेलोरा ते मुंबई विमानसेवा देण्यात ज्या तांत्रिक अडचणी आहेत, त्याबाबतही माहिती दिल्ली आहे. यात एअर इंडियाला डीजीसीएने सुलभ पर्याय सुचवण्याबाबत सांगितले आहे. यातच सध्या वेळ जात असल्याचे सुत्राने सांगितले.

बेलोरा विमानतळासाठी मार्ग निश्चित करणे एअर इंडियासाठी सुलभ नसून त्यांना एकतर इतर विमानतळावरून बेलोरा विमानतळाकडे त्यांचे ७२ आसनी विमान वळवावे लागेल किंवा थेट विमानसेवेसाठी अतिरिक्त विमान राखीव ठेवावे लागणार आहे. बेलोराहून रात्रीच्या विमानात प्रवासी मिळतील काय, आठवड्यातून दोन ते तीन दिवस रात्री विमानसेवा ठेवली तर अपेक्षित उत्पन्न होईल काय की, दिवसाची फेरी न ठेवता मग रात्रीच विमानसेवा द्यावी काय, अशा अनेक तांत्रिक अडचणी आहेत. रात्री विमानोड्डाणासाठी आवश्यक डॉपलर व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी ओमनी डायरेक्शनल रेंज (डीव्हीओआर) यंत्रणा यशस्वीपणे इन्स्टॉल झाली असून रात्री लॅण्डींग व टेक ऑफकरिता ज्या रूटने विमान येईल, त्याबाबत डीजीसीए व एअर इंडियात एकमत होईनासे झाल्यामुळे बेलोरा विमानतळावरील नाईट लॅण्डींग' सहज होईल, असे दिसत नाही. यातून सुमध्य काढून नाईट लॅण्डींग सुरू झाले तर जमेची बाजू ठरेल.

अनेक तांत्रिक अडचणी

बेलोराहून रात्रीच्या विमानात प्रवासी मिळतील काय, आठवड्यातून दोन ते तीन दिवस रात्री विमानसेवा ठेवली तर अपेक्षित उत्पन्न होईल काय की, अशा अडचणी आता समोर येत आहेत.

रूट निश्चिती झाली की, नाईट लेंडिंग सुरू होणार

सध्या डीजीसीए व एअर इंडिया यांच्यात रूट निश्चितीबाबत चर्चा सुरू आहे. एकदा रूट निश्चिती झाली की, नाईट लॅण्डींग सुरू होईल. कारण, डीव्हीओआर यंत्रणेसह रात्री विमानोड्डाण तसेच विमान उतरण्यासाठी आवश्यक संपूर्ण यंत्रणा यशस्वी चाचणीसह इन्स्टॉल झाली आहे.

- गौरव उपश्याम, विमानोड्डाण तज्ज्ञ.--------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande