युगंधर सेवाभावी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून सेवाभावी उपक्रम
छत्रपती संभाजीनगर, 25 जुलै (हिं.स.)। आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त प्रति पंढरपूर, वाळूज येथे सेवाभावी उपक्रम राबवण्यात आला पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कन्या हर्षदा शिरसाट यांच्यावतीने या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. विठुरायाच्य
अ


छत्रपती संभाजीनगर, 25 जुलै (हिं.स.)।

आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त

प्रति पंढरपूर, वाळूज येथे सेवाभावी उपक्रम राबवण्यात आला पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कन्या हर्षदा शिरसाट यांच्यावतीने या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या असंख्य वारकरी व भाविक भक्तांसाठी खिचडी, फराळ व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.

पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युगंधर सेवाभावी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून हा सेवाभावी उपक्रम अत्यंत उत्साहात व भक्तिभावाने पार पडला.

वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा मानत, भाविकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलविण्याचा हा छोटासा प्रयत्न...

विठ्ठल नामाचा गजर अखंड घुमत राहो आणि सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी व मंगलमय आशीर्वाद लाभो! अशी प्रार्थना करण्यात आली. प्रती पढरपूर समजल्या जाणाऱ्या वाळूज येथील विठ्ठल मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी उसळली होती पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता अत्यंत शांततेत आणि धार्मिक वातावरणात कार्यक्रम सुरू होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande