'विठ्ठल-विठ्ठल'च्या जयघोषात पालकमंत्र्यांनी सहकुटुंब केली महाआरती; वर्धाकरांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना
वर्धा, 25 जुलै (हिं.स.) आज राज्यभरात आषाढी एकादशीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. ''विठू माऊलीच्या'' जयघोषाने पंढरपूर दुमदुमून गेले आहेच, पण त्याचबरोबर वर्धेतही विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळत आहे. वर्ध्यातील प
वर्धा भक्तिमय! 'विठ्ठल-विठ्ठल'च्या जयघोषात पालकमंत्र्यांनी सपरीवार केली महाआरती


वर्धा, 25 जुलै (हिं.स.) आज राज्यभरात आषाढी एकादशीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. 'विठू माऊलीच्या' जयघोषाने पंढरपूर दुमदुमून गेले आहेच, पण त्याचबरोबर वर्धेतही विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळत आहे. वर्ध्यातील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरात आज पहाटेपासूनच वर्धेकरांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि एकाच रांगेत उभे राहून भाविक पांडुरंगाचे दर्शन घेत आहेत.

याच दरम्यान वर्ध्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सपरीवार विठ्ठल मंदिरात हजेरी लावली. त्यांनी मंदिरात विठू माऊलीची महाआरती केली व विठ्ठल-रुक्मिणीचे भावूक दर्शन घेतले. या प्रसंगी विठ्ठलाच्या वेशभूषेत आलेल्या बाल-गोपालांशीही त्यांनी प्रेमाने संवाद साधला.तसेच वर्धेकरांच्या सुख समृद्धी व सुदृढ आरोग्य राहावं अशी प्रार्थना केल्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले. वर्धेतील नागरिक सुखी-समृद्ध राहावेत आणि संपूर्ण राज्यावर पांडुरंगाचा असाच कृपादृष्टीचा हात राहो, अशी मनोमन प्रार्थना पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केल्याची माहिती मंदिर ट्रस्ट आणि भक्तगणांनी दिली आहे. एकंदरीतच आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण वर्धा शहर 'ज्ञानबा तुकाराम' आणि 'विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल'च्या जयघोषात पूर्णपणे भक्तिमय झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande