नवी मुंबईत रविवारी रंगणार महाराजस्व समाधान शिबीर
ठाणे, 25 जुलै (हिं.स.)। महसूल प्रशासनाला अधिक लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक बनवत सर्वसामान्य नागरिकांच्या शासकीय कामकाजाशी निगडित तक्रारी व प्रलंबित प्रश्न एकाच ठिकाणी सोडवण्याच्या उद्देशाने ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने उद्या, रविवारी दिनांक २६
नवी मुंबईत रविवारी रंगणार महाराजस्व समाधान शिबीर


ठाणे, 25 जुलै (हिं.स.)। महसूल प्रशासनाला अधिक लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक बनवत सर्वसामान्य नागरिकांच्या शासकीय कामकाजाशी निगडित तक्रारी व प्रलंबित प्रश्न एकाच ठिकाणी सोडवण्याच्या उद्देशाने ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने उद्या, रविवारी दिनांक २६ जुलै २०२६ रोजी १५१-बेलापूर विधानसभा मतदारसंघात 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले आहे.

नवी मुंबईतील सीवूड्स, सेक्टर ४२ A येथील प्रसिद्ध 'मातृ मिलन चर्च सभागृह' येथे या विशेष समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून, उद्या सकाळी अत्यंत उत्साही वातावरणात या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. स्थानिक आमदार मंदा विजय म्हात्रे यांच्या विशेष उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली हे शिबीर पार पडणार असून ठाणे उपविभागीय अधिकारी उर्मिला पाटील यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली संपूर्ण महसूल प्रशासन आणि विविध शासकीय विभागांची पथके नागरिकांच्या सेवेसाठी या ठिकाणी सज्ज राहणार आहेत.

या महाराजस्व समाधान शिबीराच्या माध्यमातून महसूल विभागाशी संबंधित विविध प्रकारचे दाखले, सातबारा उतारा, फेरफार नोंदी, शिधापत्रिका दुरुस्ती व नवीन अर्ज, तसेच इतर शासकीय योजनांचे लाभ नागरिकांना थेट आणि एकाच छताखाली मिळवून दिले जाणार आहेत. सर्वसामान्य जनतेला शासकीय कार्यालयांचे वारंवार फेरे मारावे लागू नयेत आणि त्यांच्या अर्जांचा निपटारा तातडीने व्हावा, हा या शिबीराचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आणि नागरिकांना अचूक मार्गदर्शन मिळावे यासाठी प्रशासकीय स्तरावर सर्व व्यवस्था पूर्ण झाली असून संपर्क व अधिक माहितीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय ठाणे यांच्या ९१५२६२७५७५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बेलापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिक, शेतकरी, महिला, विद्यार्थी व वृद्धांनी या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आग्रही आवाहन स्थानिक आमदार मंदा म्हात्रे, ठाणे उपविभागीय अधिकारी उर्मिला पाटील आणि संपूर्ण ठाणे जिल्हा महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande