अमरावती - टिटंबा आश्रमशाळेतील ३५ विद्यार्थ्यांना विषबाधा
अमरावती, 26 जुलै (हिं.स.) धारणी तालुक्यातील टिटंबा येथील आदिवासी आश्रमशाळेत शनिवारी रात्री जेवणातून निवासी विद्यार्थ्यांना अन्न विषबाधा झाली.. सूत्रांनुसार, विषबाधेची लक्षणे आढळलेल्या ३५ मुलांना तेथून उपचारासाठी धारणी येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल
टिटंबा आश्रमशाळेतील ३५ विद्यार्थ्यांना विषबाधा


अमरावती, 26 जुलै (हिं.स.)

धारणी तालुक्यातील टिटंबा येथील आदिवासी आश्रमशाळेत शनिवारी रात्री जेवणातून निवासी विद्यार्थ्यांना अन्न विषबाधा झाली.. सूत्रांनुसार, विषबाधेची लक्षणे आढळलेल्या ३५ मुलांना तेथून उपचारासाठी धारणी येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

धारणी तालुक्यातील संपूर्ण आश्रमशाळांसाठी टेंबली येथील आदिवासी आश्रमशाळेत सेंट्रल किचन आहे. तेथूनच जेवण तयार करून पाठविले जाते. आतापर्यंत केवळ टिटंबा या गावातील आश्रमशाळेतून विषबाधा झाली आहे. विषबाधा झाल्याची घटना कळताच, गावातील वाहनधारकांनी विलंब न लावता आपापल्या वाहनातून विद्यार्थ्यांना उपजिल्हा रुग्णालयात तातडीने आणले.

दरम्यान, याबाबत काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता, त्यांनी भात खल्यांनातर उलटी व पोटदुखी चा त्रास सुरू झाल्याचे सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande