
बीड, 27 जुलै (हिं.स.) :शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त परळी तालुका शिवसेनेकडून प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाला रुद्र अभिषेक करण्यात आला.
शिवसेना पक्षप्रमुख यांना दीर्घायु व निरोगी आयुष्य लाभावे यासाठी आज रोजी (सोमवार) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रभू वैद्यनाथाला पंचअमृताने रुद्र अभिषेक करून हर हर महादेव चा जयघोष करण्यात आला .यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नारायण सातपुते तालुकाप्रमुख भोजराज पालीवाल शहर प्रमुख राजेश विभुते परळी विधानसभा प्रमुख जगन्नाथ साळुंखे उप तालुका प्रमुख महेश केंद्रे तालुका संघटक सुरेश जाधव तालुका सचिव प्रकाश साळुंखे युवा सेना उपजिल्हाधिकारी सचिन लोढा युवा सेना शहर समन्वय राहुल उपाडे तालुका समन्वय विष्णू राठोड विभाग प्रमुख विशाल सुगरे शाखाप्रमुख विजय जाधव हरीश पालीवाल बालाजी नागरगोजे इत्यादी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis