ओझरजवळ उड्डाणपुलाला भगदाड
ओझर परिसरातील राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोडवर वाहतूक कोलमडली ओझर, 26 जुलै (हिं.स.)। ओझर परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर भगदाड पडले.त्यामुळे रस्त्याचे काम सुरू असल्याने मुख्य मार्गावरील वाहतूक सर्व्हिस रोडवर वळविण्यात आली . अशातच सर्व्हिस र
Crash on flyover near Ozar


ओझर परिसरातील राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोडवर वाहतूक कोलमडली

ओझर, 26 जुलै (हिं.स.)।

ओझर परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर भगदाड पडले.त्यामुळे रस्त्याचे काम सुरू असल्याने मुख्य मार्गावरील वाहतूक सर्व्हिस रोडवर वळविण्यात आली . अशातच सर्व्हिस रोडवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) बस अचानक नादुरुस्त झाल्याने वाहतुकीचा पूर्णपणे खोळंबा झाला. परिणामी परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.रस्त्याच्या मध्यभागी बस बंद पडल्यामुळे कार, दुचाकी, मालवाहू वाहने, प्रवासी वाहने तसेच रुग्णवाहिकाही वाहतूक कोंडीत अडकून पडल्या.

पावसामुळे आधीच संथ झालेली वाहतूक रस्ता दुरुस्ती आणि बस नादुरुस्त झाल्यानंतर पूर्णपणे विस्कळीत झाली. अनेक प्रवाशांना तासन्तास वाहतूक कोंडीत अडकून मनस्ताप सहन करावा लागला.घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस आणि संबंधित यंत्रणेचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत झाली. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असताना सर्व्हिस रोडवर दिवसेंदिवस वाहतुकीचा ताण वाढत असून, अशा घटना वारंवार घडत असल्याने वाहनचालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. सर्व्हिस रोडची क्षमता, वाहतूक व्यवस्थापन आणि आपत्कालीन नियोजनाबाबत संबंधित यंत्रणांनी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक आणि वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. महामार्गावर भगदाड पडलेच कसे ? रस्ते कामांची चौकशी व्हावी अशी मागणीही नागरिकांनी केली

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande