सोलापूरच्या 24x7 पाणीपुरवठ्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल; जागतिक बँक व मनपाची उच्चस्तरीय कार्यशाळा संपन्न
सोलापूर, 26 जुलै (हिं.स.)। सोलापूर शहरातील नागरिकांना सातत्यपूर्ण, सुरक्षित, विश्वासार्ह आणि शाश्वत 24x7 पाणीपुरवठा सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सोलापूर महानगरपालिका आणि जागतिक बँकेच्या प्रतिनिधींची “Workshop on Solapur 24/7 Water Supply
smc


सोलापूर, 26 जुलै (हिं.स.)।

सोलापूर शहरातील नागरिकांना सातत्यपूर्ण, सुरक्षित, विश्वासार्ह आणि शाश्वत 24x7 पाणीपुरवठा सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सोलापूर महानगरपालिका आणि जागतिक बँकेच्या प्रतिनिधींची “Workshop on Solapur 24/7 Water Supply Improvements” ही उच्चस्तरीय एकदिवसीय कार्यशाळा शनिवारी सोलापूर महानगरपालिका कार्यालयात संपन्न झाली. कार्यशाळेस जागतिक बँकेकडून डॉ. आलोक सुमन, श्रीनिवास राव, जोर्ग, कॅमेन यी, रोझ डोमिंगोस, गुस्तावो, मूर्ती आणि सुमन उपस्थित होते.

सोलापूर महानगरपालिकेकडून मा. महापौर विनायक कोंड्याल, मा. उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर, मा. स्थायी समिती सभापती रंजिता चाकिते, मा. सभागृह नेते नरेंद्र काळे, भाजप सोलापूर शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त-2 संदीप कारंजे, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे आणि अभियंता उमर बागबान व इतर अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यशाळेत सोलापूर शहराच्या विद्यमान पाणीपुरवठा व्यवस्थेतील आव्हाने, शहराची वाढती लोकसंख्या व भविष्यातील पाण्याची मागणी, उपलब्ध जलस्रोतांची दीर्घकालीन सुरक्षितता आणि सध्याच्या ठरावीक वेळेच्या पाणीपुरवठ्यातून निरंतर 24x7 पाणीपुरवठ्याकडे संक्रमण करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

सोलापूर शहराच्या अंतर्गत पाणीपुरवठा सुधारणा प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे (DPR) सादरीकरण करण्यात आले. यामध्ये शहराची विद्यमान व भविष्यातील पाण्याची मागणी, शहरवाढीचे कल, अस्तित्वातील पाणीपुरवठा पायाभूत सुविधांची स्थिती, आवश्यक बळकटीकरण, बल्क वॉटर आणि वितरण प्रणालीतील प्रस्तावित सुधारणा, भांडवली गुंतवणूक, प्रकल्प अंमलबजावणीचे टप्पे आणि नागरिकांना मिळणाऱ्या अपेक्षित सेवा सुधारणांचा आढावा घेण्यात आहे.

24x7 पाणीपुरवठा यशस्वी करण्यासाठी Non-Revenue Water (NRW) कमी करणे, पाणीगळतीवर नियंत्रण, मागणी व्यवस्थापन आणि वितरण व्यवस्थेची कार्यक्षमता वाढविणे या बाबींना प्राधान्य देण्याचे अधोरेखित करण्यात आले.

शहरात District Metered Areas (DMAs) विकसित करून प्रत्येक भागातील पाण्याचा प्रवाह व दाब यांचे नियमित निरीक्षण करणे, पाणीगळती ओळखणे आणि टप्प्याटप्प्याने 24x7 पाणीपुरवठा क्षेत्र विकसित करण्याच्या कार्यपद्धतीवर चर्चा करण्यात आली.

प्रकल्पांतर्गत शहरातील पात्र घरांना मीटरयुक्त नळजोडणी देणे, पाणीपुरवठा व्यवस्थेचे SCADA आधारित रिअल-टाइम मॉनिटरिंग, प्रतिबंधात्मक व दुरुस्ती देखभाल, प्रभावी बिलिंग व महसूल व्यवस्थापन तसेच उत्तरदायित्वाची यंत्रणा सक्षम करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande