मोटार वाहन निरीक्षकांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह; धाराशिवची नियुक्ती, काम मात्र सोलापुरात?
सोलापूर, 26 जुलै (हिं.स.)। परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक संदीप शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत असून, त्यांची नियुक्ती धाराशिव जिल्ह्यात असताना ते सोलापुरात कार्यरत राहून कथित वसुली करत असल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणामु
मोटार वाहन निरीक्षकांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह; धाराशिवची नियुक्ती, काम मात्र सोलापुरात?


सोलापूर, 26 जुलै (हिं.स.)।

परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक संदीप शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत असून, त्यांची नियुक्ती धाराशिव जिल्ह्यात असताना ते सोलापुरात कार्यरत राहून कथित वसुली करत असल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणामुळे परिवहन विभागात खळबळ उडाली असून, संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत चौकशीची मागणी होत आहे.

उपलब्ध माहितीनुसार, संदीप शिंदे यांची नियुक्ती धाराशिव जिल्ह्यात करण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात ते सोलापूर परिसरात कार्यरत असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे नियुक्ती एका जिल्ह्यात आणि कामकाज दुसऱ्या जिल्ह्यात कसे सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या प्रकरणात काही गंभीर मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली आहे. नियुक्ती आदेशांचे उल्लंघन झाले आहे का? वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने हे काम सुरू आहे की नियमांना बगल देण्यात आली आहे? तसेच वाहतूक विभागातील कथित वसुलीच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी होणार का, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

नागरिकांनी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणावे, दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि वाहतूक विभागातील कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालावा, अशी मागणी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande