पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद बैठकीत विविध महत्त्वपूर्ण विषयांना मान्यता
पुणे, 26 जुलै (हिं.स.)सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या (Management Council) नुकत्याच पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत शैक्षणिक गुणवत्ता वाढ, उद्योग-विद्यापीठ सहकार्य (MoU), नवे अभ्यासक्रम आणि विद्यार्थी कल्याणाशी संबंधित अ
University Pune SPUU


पुणे, 26 जुलै (हिं.स.)सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या (Management Council) नुकत्याच पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत शैक्षणिक गुणवत्ता वाढ, उद्योग-विद्यापीठ सहकार्य (MoU), नवे अभ्यासक्रम आणि विद्यार्थी कल्याणाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

या बैठकीत घेण्यात आलेल्या प्रमुख निर्णयांचा संक्षिप्त आढावा :

१. १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभाग

१०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सहसंयोजक म्हणून सहभागी होणार आहे.या निमित्ताने विद्यापीठ परिसर आणि सर्व संलग्न महाविद्यालयांमध्ये विविध साहित्य-संस्कृती उपक्रम, चर्चासत्रे आणि संमेलनांचे भव्य आयोजन केले जाणार आहे.

२. शैक्षणिक व तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख सामंजस्य करार (MoUs)

विद्यापीठाने संशोधन, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी विविध नामवंत संस्थांशी करार केले आहेत:

IICRM सोबत करार नूतनीकरण: Indian Institute of Clinical Research & Management (IICRM) सोबत करार नूतनीकरण करून 'Advanced Course in Clinical Research with Artificial Intelligence (ACCRAI)' हा अभ्यासक्रम सुरू केला जाईल.

* Pune Knowledge Cluster Foundation (PKCF): नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाच्या अंतर्गत व्याख्याने, कार्यशाळा, शिक्षक प्रशिक्षण, परिषदा आणि संयुक्त संशोधन (R&D) आयोजित केले जातील.

* Medallion Shooting Foundation, Pune: क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळामार्फत विद्यापीठाच्या नेमबाजी श्रेणी (Shooting Range) प्रशिक्षण व देखभालीसाठी करार.

* IBM India Pvt. Ltd. & Cache Technologies: तंत्रज्ञान विभागामार्फत बी.टेक. व एम.टेक. विद्यार्थ्यांसाठी 'IBM Innovation ICE Program', शिक्षक प्रशिक्षण व अतिथी व्याख्याने आयोजित केली जातील.

CAPSS, Delhi: संरक्षण व सामरिक शास्त्र विभागामार्फत Centre for Aerospace Power and Strategic Studies (CAPSS) सोबत संशोधक/अभ्यागतांची देवाणघेवाण, संयुक्त संशोधन प्रकल्प आणि इंटर्नशिप प्रोग्राम राबवले जातील.

ITUS Sports and Safety Pvt. Ltd.: राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागामार्फत आपत्ती व्यवस्थापन ज्ञान प्रसार आणि रोजगार निर्मितीसाठी सहकार्य केले जाईल.

३. नवीन अभ्यासक्रम व NEP 2020 अंतर्गत मान्यता

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) ची प्रभावी अंमलबजावणी करताना विद्यापीठाने अनेक नवीन अभ्यासक्रमांना मंजुरी दिली आहे:

मानवविज्ञान विद्याशाखा: Advanced Course in Digital Humanities & Archiving (44 Credit) या नव्या पायाभूत अभ्यासक्रमास मान्यता.

रोबोटिक्स व ई-व्हीकल आधारित ७ नवीन अभ्यासक्रम: Mechanical and Material Technology अंतर्गत ड्रोन पायलाटिंग, इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) रिपेअरिंग, CAD-CAM 3D डिझाइन, CNC/VMC ऑपरेटर आणि इंडस्ट्रियल रोबोटिक्स यांसारख्या ७ फाउंडेशन व ॲडव्हान्स अभ्यासक्रमांना मान्यता.

BE Advanced Communication Technology: चतुर्थ वर्षाच्या अभ्यासक्रमास मंजुरी.

* M.E. Mechanical Engineering (EV Technology): पदव्युत्तर पदवीच्या नव्या आराखड्यास व अभ्यासक्रमास मान्यता.

अभियांत्रिकी पदव्यांचे नवीन नामांकरण (Degree Nomenclature): NEP 2020 नुसार स्वायत्त (B.Tech.) व अस्वायत्त (B.E.) अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी Multidisciplinary Minor, Honors, Honors with Research, आणि Double Minors पदव्यांच्या नामांकनास मान्यता देण्यात आली.

४. कै. अर्जुन सोनवणे यांच्या कुटुंबीयांना १ लाख रुपयांची आर्थिक मदत

विद्यापीठाच्या धनुर्विद्या (मुले) संघातील गुणवंत खेळाडू कै. अर्जुन सोनवणे (बी.ए. द्वितीय वर्ष, मराठा विद्या प्रसारक समाज महाविद्यालय, केडगाव) यांचे अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ धनुर्विद्या स्पर्धेतून परतताना कोटा जंक्शन येथे झालेल्या दुर्दैवी रेल्वे अपघातात निधन झाले.

व्यवस्थापन परिषदेने कै. अर्जुन सोनवणे यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून, त्यांच्या भावनाव्यकुल कुटुंबीयांना ₹१,००,००० (एक लाख रुपये) एवढी आर्थिक मदत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

५. १२७ वा पदवीप्रदान समारंभ

माहे ऑगस्ट/सप्टेंबर २०२६ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या १२७ व्या पदवीप्रदान समारंभात सर्व पात्र विद्यार्थ्यांना पदवी, पदविका व इतर शैक्षणिक उपाधी प्रदान करण्याच्या प्रस्तावास व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande