पुणे : अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेसाठी आधार प्रमाणीकरणाचे आवाहन
पुणे, 27 जुलै (हिं.स.)। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत आपले नाव आलेल्या शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर जावून आपले आधार प्रमाणीकरण करुन घेण्याचे आवाहन पुणे ग्रामीण सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी केल
Jdjd


पुणे, 27 जुलै (हिं.स.)। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत आपले नाव आलेल्या शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर जावून आपले आधार प्रमाणीकरण करुन घेण्याचे आवाहन पुणे ग्रामीण सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी केले आहे.

आधार प्रमाणीकरणाकरणाची सुलभ कार्यपद्धती निश्चित करण्यात आली असून शेतकऱ्यांनी केंद्र चालकास आधार क्रमांक किंवा कर्जमुक्ती यादीतील त्याच्या नावासमोरचा विशिष्ट क्रमांक सादर करावा. केंद्र चालकाने शेतकऱ्यांच्या विशिष्ट क्रमांक किंवा आधार क्रमांकाद्वारे शेतकऱ्यांची अँग्रीस्टॅक नोंदणी पोर्टलवरून तपासावी शेतकऱ्यांची अँग्रीस्टॅक नोंदणी झाली नसल्यास केंद्र चालकाने शेतकऱ्यांची अँग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी करावी. केंद्र चालकाने शेतकऱ्यांची अँग्रीस्टॅक नोंदणी झाल्याची खात्री झाल्यानंतर शेतकऱ्यांचा कर्ज खात्याचा तपशील प्राप्त करावा. केंद्र चालकाने संगणक पटलावर दिसत असलेल्या आधार क्रमांक, कर्ज खाते क्रमांक व कर्ज खात्यातील थकीत रकमेबाबत शेतकऱ्यांकडून खात्री करून घ्यावी. शेतकऱ्यांनी सर्व माहितीस सहमती दर्शवल्यासः बायोमेट्रिक पद्धतीने प्रमाणीकरण करावे. Agree व Submit ही प्रक्रिया पूर्ण करावी व प्रणालीवरून प्राप्त झालेली पावती शेतकऱ्याला द्यावी.

------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande