तुळजापूर येथे २८ जुलै रोजी समाधान व महाआरोग्य शिबिर
छत्रपती संभाजीनगर, 27 जुलै (हिं.स.) : महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ अंतर्गत तुळजापूर विधानसभा मतदारसंघस्तरीय समाधान व महाआरोग्य शिबिराचे आयोजन मंगळवार, २८ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता नळदुर्ग रोडवरील वंश मंगल कार्
तुळजापूर येथे २८ जुलै रोजी समाधान व महाआरोग्य शिबिर


छत्रपती संभाजीनगर, 27 जुलै (हिं.स.) : महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ अंतर्गत तुळजापूर विधानसभा मतदारसंघस्तरीय समाधान व महाआरोग्य शिबिराचे आयोजन मंगळवार, २८ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता नळदुर्ग रोडवरील वंश मंगल कार्यालय, तुळजापूर येथे करण्यात आले आहे. या शिबिराचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

या शिबिराचे उद्घाटन तुळजापूरचे आमदार रणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते होणार असून, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासह विधान परिषदेचे सदस्य बसवराज पाटील, विक्रम काळे आणि सतीश चव्हाण, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, तुळजापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष विनोद (पिटू) गंगणे, नळदुर्ग नगर परिषदेचे नगराध्यक्ष बसवराज धरणे तसेच तुळजापूर पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह देशमुख यांची उपस्थिती राहणार आहे.

शिबिरात विविध शासकीय विभागांच्या योजनांची माहिती, नागरिकांच्या तक्रारींचे निवारण, विविध योजनांसाठी अर्ज स्वीकारणे तसेच आरोग्यविषयक सेवा आणि मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

मंगळवार, २८ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता वंश मंगल कार्यालय, नळदुर्ग रोड, तुळजापूर येथे आयोजित या समाधान व महाआरोग्य शिबिराचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख यांनी केले आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande