नांदेड-वाघाळा महापालिकेच्या कथित बेकायदेशीर वृक्षतोडीप्रकरणी चौकशीची मागणी
नांदेड, 27 जुलै (हिं.स.)। नांदेड-वाघाळा महानगरपालिकेने सन २०२५–२६ दरम्यान अतिक्रमण हटाव व रस्तारुंदीकरण मोहिमेदरम्यान कथितपणे नियमबाह्य वृक्षतोड केल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांकडे सविस्तर तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, स
नांदेड-वाघाळा महापालिकेच्या कथित बेकायदेशीर वृक्षतोडीप्रकरणी चौकशीची मागणी


नांदेड, 27 जुलै (हिं.स.)। नांदेड-वाघाळा महानगरपालिकेने सन २०२५–२६ दरम्यान अतिक्रमण हटाव व रस्तारुंदीकरण मोहिमेदरम्यान कथितपणे नियमबाह्य वृक्षतोड केल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांकडे सविस्तर तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, संबंधित वृक्षतोडीसाठी आवश्यक असलेली ट्री अथॉरिटीची मंजुरी, परवानग्या, तपासणी अहवाल तसेच भरपाई स्वरूपात करण्यात आलेल्या वृक्षलागवडीची माहिती माहिती अधिकार अंतर्गत मागविण्यात आली होती. मात्र, ही माहिती उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, विभागीय कारवाई करावी आणि संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या आरोपांवर नांदेड-वाघाळा महानगरपालिकेकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. तसेच, योग्य कारवाई न झाल्यास राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण किंवा सक्षम न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशाराही तक्रारदारांनी दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande