
छत्रपती संभाजीनगर, 27 जुलै (हिं.स.)।दि जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची महत्त्वपूर्ण सभा आज जालना येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला अधिक मजबूत करणे, बँकेचा सर्वांगीण विकास साधणे आणि मुख्यत्वे शेतकरी बांधवांसह सर्व सभासदांचे हित केंद्रस्थानी ठेवून विविध प्रशासकीय व धोरणात्मक विषयांवर या सभेत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी सर्वश्री सतीशजी टोपे, भीमरावजी जावळे, मा.आमदार अरविंदजी चव्हाण, राहुलजी लोणीकर, शालिकरामजी म्हस्के, जहीर शेख नसीर, सौ. शीतलताई कुचे, मनीषा गोरे, निर्मला मरकड, रितेशजी कामड यांच्यासह बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis