जॉन अब्राहम पुन्हा अॅक्शन अवतारात; ‘द डिप्लोमॅट’च्या दिग्दर्शकासोबत करणार काम
मुंबई, 11 ऑगस्ट (हिं.स.)। अभिनेता जॉन अब्राहम सध्या ‘फोर्स 3’च्या तयारीत व्यस्त असतानाच त्याच्या आगामी चित्रपटाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जॉन अब्राहम पुन्हा एकदा दिग्दर्शक शिवम नायर यांच्यासोबत काम करणार आहे. दोघांनी यापूर्वी 2025 मध्ये प
John


मुंबई, 11 ऑगस्ट (हिं.स.)। अभिनेता जॉन अब्राहम सध्या ‘फोर्स 3’च्या तयारीत व्यस्त असतानाच त्याच्या आगामी चित्रपटाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जॉन अब्राहम पुन्हा एकदा दिग्दर्शक शिवम नायर यांच्यासोबत काम करणार आहे. दोघांनी यापूर्वी 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द डिप्लोमॅट’ या चित्रपटासाठी एकत्र काम केले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, जॉन आणि शिवम नायर एका अनाम अॅक्शन थ्रिलर चित्रपटासाठी पुन्हा एकत्र येत आहेत. या चित्रपटात जॉनसोबत आणखी एक अभिनेता मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र, या अभिनेत्याच्या नावाचा अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही.

हा चित्रपट मोठ्या स्तरावरील कमर्शियल एंटरटेनर असणार असून, शिवम नायर यांच्या कारकिर्दीतील सर्वात मेनस्ट्रीम प्रोजेक्ट्सपैकी एक असल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटाची संकल्पना जॉनला पसंत पडल्याने त्याने या प्रोजेक्टसाठी तातडीने होकार दिल्याचे वृत्त आहे. हाय-ऑक्टेन अॅक्शन आणि रोमांचाने भरलेल्या या चित्रपटाचे शूटिंग यावर्षीच्या अखेरीस सुरू करण्याची निर्मात्यांची योजना आहे.

दरम्यान, जॉन अब्राहमच्या ‘फोर्स 3’चीही जोरदार चर्चा आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत हर्षवर्धन राणे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून, ‘फोर्स 3’ 19 मार्च 2027 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

याशिवाय, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या जीवनावर आधारित बायोपिकमध्येही जॉन महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. शिवम नायर यांच्यासोबतचा आगामी अॅक्शन थ्रिलर 2027च्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याची तयारी सुरू असल्याचे समजते.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande