‘झी मराठी’च्या कलाकारांनी सांगितला स्वातंत्र्याचा अर्थ
मुंबई, 12 ऑगस्ट, (हिं.स.)। आजचा भारतीय अधिक आत्मविश्वासाने स्वतःचे विचार मांडताना, स्वतःचे निर्णय घेताना आणि नव्या संधींचा स्वीकार करताना दिसतो. या बदलाचा समाजावर आणि मनोरंजन क्षेत्रावरही परिणाम झाला आहे. ‘झी मराठी’च्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भ
झी


मुंबई, 12 ऑगस्ट, (हिं.स.)। आजचा भारतीय अधिक आत्मविश्वासाने स्वतःचे विचार मांडताना, स्वतःचे निर्णय घेताना आणि नव्या संधींचा स्वीकार करताना दिसतो. या बदलाचा समाजावर आणि मनोरंजन क्षेत्रावरही परिणाम झाला आहे. ‘झी मराठी’च्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या कलाकारांनी स्वातंत्र्याचा त्यांच्यासाठी असलेला अर्थ आणि नव्या पिढीने जपावयाच्या मूल्यांबद्दल आपले विचार व्यक्त केले.

*‘कमळी’* मालिकेतील *‘ऋषी’* म्हणजेच *निखिल दामले* यांच्या मते, मला गेल्या काही दशकांमधला सकारात्मक बदल जो भारतीयांमध्ये जाणवतो तो म्हणजे आत्मविश्वास. नवीन नवीन संधी आपल्याला आपल्या शिक्षणासाठी किंवा प्रोफेशन प्रमाणे उपलब्ध होत आहेत. नुसती संधी उपलब्ध होत नाही आहे तर त्या संधीचा सदुपयोग करण्याची क्षमता सुद्धा नागरिकांमध्ये वाढतेय, हे स्पष्ट दिसायला लागलय. मनोरंजन क्षेत्रातही हाच आत्मविश्वास दिसत असल्याचे सांगताना निखिल म्हणाला , “भारतीयांच्या आत्मविश्वासाने भारत देश पुढे अग्रेसर करत आहे, असाच आत्मविश्वास आज कलाकारांमध्ये, मनोरंजन क्षेत्रात सुद्धा आलेला आहे. ज्या प्रकारचे आपण विषय मांडत आहोत, सामाजिक म्हणा, इंटर पर्सनल रिलेशनशीपस मधले विषय म्हणा, ह्या व्यतिरिक्त हि काही विषय आपण स्पष्टतेने, ठामपणे मांडत आहोत. मनोरंजन माध्यमातून नव्या पद्धतीची कलाकृती ही आपण हल्ली जगासमोर आणतोय, नवे नवे उत्तम विषय अधिक आत्मविश्वासाने सादर केले जात आहेत, हि खूप चांगली गोष्ट आहे आणि मी आनंदी आहे कि हे असच चालु राहोत.” स्वातंत्र्याचा स्वतःसाठीचा अर्थ सांगताना निखिल म्हणाला, “स्वातंत्र्य म्हणजे स्वतःला अपग्रेड करण्याची एक संधी मला वाटते. जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य असत, स्वतःचे स्वतः निर्णय घेण्याचं किंवा आपल्याला जे वाटतंय ते करण्याचं स्वातंत्र्य, तेव्हा आपल्याकडून खूप काही तरी चांगली छान गोष्ट घडु शकते, असं मला वाटतं.” आपल्या कलेतही हीच भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते सांगतात. “मला वाटत जेव्हा मला माझी भूमिका, माझी कला मला स्वतंत्रपणे करायला... दाखवायला मिळते तेव्हा आपण जास्त निर्मितिक्षम होऊ शकतो, एक्स्प्रेशन मध्ये म्हणा किंवा भूमिकेच्या शैली प्रदर्शित करण्यामध्ये म्हणा. आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यामुळे, आपल्या कार्यक्षमतेला नक्कीच वाढ मिळते असं मला ठामपणे वाटत.”

पुढील पिढीला संदेश देताना निखिलनी आत्मविश्वासासोबत देशाप्रती प्रेम, आदर आणि आत्मपरीक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. “देशाबद्दलच प्रेम आणि आदर हा कधी कमी नाही झाला पाहिजे, आपल्या भारताला एक सुंदर इतिहास आहे, आपली खूप छान अशी भारतीय संस्कृती... संस्कार आहेत आणि त्या सगळ्याचा आपण सन्मान केला पाहिजे. कुठल्या हि गोष्टीत उणीव दाखवण्याच्या आधी आपण आपलं स्वपरीक्षण सुद्धा केलं पाहिजे. स्वपरीक्षणाने चांगलं आत्मसात करून आपण स्वतःच आयुष्य चांगलं करत असतोच पण त्या सोबतच आपण आपल्या आजूबाजूच्या, आपल्या सभोवतील समाजाचं पण भलं करत असतो, असं मला वाटत.”

*‘सनई चौघडे’* मालिकेतील *‘असावरी’* म्हणजेच *जुई गोगरी* हिच्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे स्वतःची ओळख निर्माण करण्याची आणि स्वतःचे विचार निर्भयपणे मांडण्याची ताकद. माझ्यासाठी स्वातंत्र्यता म्हणजे स्वतःची ओळख निर्माण करण किंवा न घाबरता स्वतःचे विचार मांडणं असा आहे, जबाबदारीने वागणं, माझे निर्णय मी स्वतः घेणं, खरंतर मी माझ्या भूमिकांमधून पण हाच मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत असते. आपण किती सक्षम आहोत, आपण स्वतःसाठी खंबीरपणे उभं राहील पाहिजे, हे मी सतत माझ्या भूमिकांमधून दाखवण्याचा प्रयत्न करत असते आणि करत राहणार.”आजचा भारत आणि मनोरंजन क्षेत्र आत्मविश्वासाने पुढे जात असल्याचे सांगताना जुई म्हणाली, “आजचा भारत नवीन विचारांनी आणि आत्मविश्वासाने पुढे जात आहे. मनोरंजनाचे क्षेत्र पण पूर्ण आत्मविश्वासाने पुढे पुढे जात आहे असं मला वाटतं.” आज चित्रपट आणि मालिकांमधून देशाच्या मातीतील प्रेरणादायी कथा आणि वीरांच्या गाथा प्रेक्षकांसमोर येत असल्याचेही त्या सांगतात.

*‘तारिणी’* मालिकेतील *‘कौशिकी’* म्हणजेच *अभिज्ञा भावे* यांच्या मते, गेल्या काही वर्षांत नागरिकांमध्ये सामाजिक जबाबदारी आणि जागरूकता वाढल्याचे अनेक छोट्या छोट्या उदाहरणांतून दिसून येते. कोविड नंतर मी जो नागरिकांमध्ये बदल पाहिलाय तो म्हणजे लोक आजकाल रस्त्यावरून ऍम्ब्युलन्स जर जात असेल तर ते त्या गाडीला जाण्यासाठी रस्ता मोकळा करून देतात, अधिक सांगायचं झालं तर पशूंवरती जी कधी कधी कठोरता केली जातेय त्यावर अधिक जागरूकता निर्माण झालेली आहे. लोक आजकल मत मांडण्यासाठी बोलतात, चुकीच्या गोष्टींचा विरोध दर्शवतात, ह्या सगळ्यात विलक्षण वाढ झालेली असं मला वाटतं. महिला, वृद्ध आणि प्राण्यांच्या सुरक्षिततेबाबत वाढलेली जागरूकता, वाहतुकीचे नियम पाळण्याची वाढलेली सवय आणि भारतीय लघु उद्योगांना मिळणारा वाव याकडेही सकारात्मक बदल दिसतायत . तंत्रज्ञान आणि सोशल मीडियामुळे कलाकारांना आणि लघु उद्योगांना लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी अधिक सहज उपलब्ध होत आहेत.

एक कलाकार म्हणून सामाजिक जबाबदारी कशी जपता येते, याबद्दल अभिज्ञा म्हणाली, “काही खाजगी कार्यक्रमांमध्ये मला जेव्हा कलाकार म्हणून बोलावलं जात किंवा मला जिथे जाण्याची संधी मिळते, जिथे मला शक्य होईल तिथे मी काही काही बदल सुचविण्याचे प्रयत्न नक्कीच करते. मी सुचवते कि जिथे शाल आणि श्रीफळ देताय मान्यवरांना तिथे एखाद तुळशीचं रोपटं द्या.” आपल्या दैनंदिन वागण्यातूनही पर्यावरण आणि समाजाप्रती जबाबदारी जपण्याचा प्रयत्न करत असल्याचे तिनी सांगितले. नव्या पिढीला संदेश देताना अभिज्ञा म्हणाली, “मी एवढच सांगेन, कचरा करू नका, प्राण्यांना वाईट वागवू नका.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande