पुणे : ‘पंचपरिवर्तन’ शॉर्टफिल्म स्पर्धेचा रविवारी पारितोषिक वितरण सोहळा
पुणे, 12 ऑगस्ट (हिं.स.)।राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘मिती फिल्म सोसायटी’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘पंचपरिवर्तन’ रील व शॉर्टफिल्म स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी (दि. १६ ऑगस्ट) एरंडवणे येथील सेवाभवनात होणार आहे. दुप
grdf


पुणे, 12 ऑगस्ट (हिं.स.)।राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘मिती फिल्म सोसायटी’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘पंचपरिवर्तन’ रील व शॉर्टफिल्म स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी (दि. १६ ऑगस्ट) एरंडवणे येथील सेवाभवनात होणार आहे. दुपारी ४ ते सायंकाळी ७ या वेळेत हा कार्यक्रम होईल.

सामाजिक समरसता, नागरी शिष्टाचार, स्वबोध जागरण, पर्यावरण संरक्षण आणि कुटुंब प्रबोधन या पाच विषयांवर आधारित या स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात दुपारी ४ ते ५.३० या वेळेत स्पर्धेतील विजेत्या रील व शॉर्टफिल्मचे स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६ ते ७ या वेळेत पारितोषिक वितरण समारंभ होईल.

रा. स्व. संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक नाना जाधव आणि अभिनेता आरोह वेलणकर यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.

सामाजिक परिवर्तनाचा संदेश प्रभावीपणे मांडणाऱ्या या लघुपटांना प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळावा, यासाठी नागरिक तसेच चित्रपटप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ‘मिती फिल्म सोसायटी’तर्फे करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande