श्रद्धा कपूरच्या ‘ईथा’ची रिलीज डेट पुढे ढकलली; ४ डिसेंबरला होणार प्रदर्शित
मुंबई, 12 ऑगस्ट (हिं.स.)। श्रद्धा कपूरच्या बहुप्रतीक्षित ‘ईथा’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली तयार झालेला हा चित्रपट यापूर्वी २८ ऑगस्ट २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र, आता ‘ईथा’
Itha


मुंबई, 12 ऑगस्ट (हिं.स.)।

श्रद्धा कपूरच्या बहुप्रतीक्षित ‘ईथा’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली तयार झालेला हा चित्रपट यापूर्वी २८ ऑगस्ट २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र, आता ‘ईथा’ ४ डिसेंबर २०२६ रोजी सिनेमागृहात दाखल होणार आहे.

महाराष्ट्राच्या प्रसिद्ध लावणी आणि तमाशा कलावंत विठाबाई नारायणगावकर यांच्या आयुष्यावर आधारित या बायोपिकमध्ये श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. रणदीप हुड्डाही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.

दरम्यान, यशचा ‘टॉक्सिक’ चित्रपट २६ ऑगस्टला प्रदर्शित होणार असल्याने ‘ईथा’ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा आहे. दोन्ही बिग बजेट चित्रपट एकाच काळात प्रदर्शित झाल्यास बॉक्स ऑफिसवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन निर्मात्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.

निर्मात्यांनी नव्या रिलीज डेटची घोषणा करताना लिहिलं, “तूफान के लिए तैयार रहना... क्योंकि ‘ईथा’ आ रही है!”

आता विठाबाईंच्या आयुष्याची ही दमदार कहाणी मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांना डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande